साळुंके रेस्क्यू टीम व पोलिसांच्या मदतीने काढला मृतदेह बाहेर
सलीम शेख
माणगाव : माणगाव शहरातील काळ नदीमध्ये अंदाजे ४० वय वर्ष असलेल्या इसमाचा मृतदेह सापडला आहे.
सविस्तर वृत्त असे की, माणगाव पोलिसांना काळ नदीमधून एक मृतदेह वाहत असल्याची बातमी मिळाली. माहिती मिळतात साळुंके रेस्क्यू टीम व माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साळुंखे रेस्क्यू टीमच्या सहाय्याने काळ नदीपात्रात अवघ्या काही वेळातच ही मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह माणगाव येथील राहुल मोरे यांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे रेस्क्यू कार्य सुरू असताना मात्र काळ नदी पुलावर बघ्याची एकच गर्दी जमली होती. जो तो आपली वाहने बाजूला लावून बघत होता. त्यामुळे पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. नक्की हा प्रकार काय घडला असावा याचा पुढील तपास माणगांव पोलीस करीत आहेत.