• Sat. Apr 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

द्रोणागिरी शहरातील पाणी प्रश्नाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळने घेतली सिडको अधिकाऱ्यांची भेट

ByEditor

Aug 29, 2023

विठ्ठल ममताबादे
उरण :
द्रोणागिरी शहरातील पाणी प्रश्नाबाबत मंगळवार, दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने सिडको अधिकारी यांची भेट घेतली व द्रोणागिरी शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा केली.

यामध्ये सेक्टर 47 प्लॉट 41 मध्ये वसलेल्या अक्षर इस्टोनिया हौसिंग सोसायटीमधील बिकट झालेल्या पाणी प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढून हा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. याबाबत सिडको अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हा पाणी प्रश्न सोडवण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. यावेळी सिडकोवर द्रोणागिरी शहराप्रमाणे नव्याने वसत असलेल्या करंजाडे शहरातील पाणी प्रश्नासाठी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक किसन म्हात्रे, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते जहुर पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!