किरण लाड
नागोठणे : विभागातील विविध विकासकामांचे उदघाटन आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते दि. ४ जून २०२३ रोजी करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

रोहा तालुक्यातील शेतफळस येथील रस्त्याचे डांबरीकरण, चिकणी येथील जोडरस्ता, भिसे खिंड ते चेराठी या रस्त्याचे डांबरीकरण, ऐनघर, तामसोली, हेदवली, सावरट या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण अशा विविध विकासकामांचे लोकार्पण पेण, नागोठणे, पाली विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या लोकार्पण सोहळ्यासाठी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, शेकाप नेते महादेव मोहिते, शेकाप नेते गणपत म्हात्रे, नागोठणे शहर भाजपचे अध्यक्ष सचिन मोदी, तिरथ पोलसानी, सिराज पानसरे, सुभाष पाटील तसेच भाजपचे विभागातील पदाधिकारी, शेतपळस, चेराठी, चिकणी, ऐनघर, तामसोली, हेदवली, भिसे, चेराठी, कालकाई येथील ग्रामस्थ, मान्यवर या लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
