अभय पाटील
बोर्ली पंचतन : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्ते बोर्ली पंचतन विद्यालयाच्यावतीने परीक्षेस एकूण १९ विद्यार्थी बसले होते त्यापैकी सर्व म्हणजे १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 100 इतकी असून प्रथम क्रमांक यास्मिन जमाल अहमद खान 88.80 टक्के, द्वितीय क्रमांक स्मितल संदेश पेडणेकर 83.60 टक्के, तृतीय क्रमांक निधी विलास सोनावणे 81.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील १९ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ६ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे सचिव डॉ. गोसावी सर, अध्यक्ष श्री. पंडीत सर व संस्थेच्या एचआर डायरेक्टर प्राचार्या डॉ. दिप्ती देशपांडे, केंद्रीय समन्वयक समितीचे विनोद देशपांडे तसेच मुंबई विभागाच्या विभागीय सचिव डॉ. संत मॅडम व श्रीवर्धन विभागाचे सचिव डॉ. मेश्राम, श्रीवर्धन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. जोशी व एन. एम बापट, आराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्हनकट्टे या सर्वांनी शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. मुरकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व सर्व यशस्वी विद्यार्थ्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.