अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालय या प्रशालेच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 94 टक्के तसेच आदगाव हायस्कुल आदगाव या विद्यालयाचा निकाल 83.33 टक्के त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल भरडखोल व मेंदडी हायस्कूल मेंदडी या दोन्ही विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून संस्थेच्या सर्व विद्यालयाच्या उत्तम निकालाची यशस्वी परंपरा यावर्षी देखील कायम राहिली आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून श्रीवर्धन तालुक्यातील जनता शिक्षण संस्था बोर्ली पंचतन या नामांकित संस्थेतील प्रशाला श्री मोहनलाल सोनी विद्यालय बोर्ली पंचतनचा मार्च 2023 च्या परीक्षेमध्ये एकूण 100 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या विद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक श्रवण प्रमोद वरणकर 90.80 टक्के, द्वितीय क्रमांक प्रथम अभय पाटील 90.20 टक्के तर तृतीय क्रमांक स्वराली मंगेश पाटील ८६.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आदगाव हायस्कूल आदगाव या विद्यालयातून 24 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या प्रशालेतील प्रथम क्रमांक नेहा महेंद्र दोडकुलकर 79.20 टक्के, द्वितीय क्रमांक प्रेरणा निलेश मोरे 78.20 टक्के, तर तृतीय क्रमांक आर्यन प्रमोद मोरे 74.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. मेंदडी हायस्कूल मेंदडी ता. म्हसळा या विद्यालयातून 25 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ होवून सर्व म्हणजेच 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम कमांक जोत्स्ना रामा पाटील 63.60 टक्के, द्वितीय क्रमांक प्राची भास्कर भगत 63.40 टक्के, तर तृतीय क्रमांक दिव्या लक्ष्मण पाटील 61.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. न्यू इंग्लिश स्कूल भरडखल तालुका श्रीवर्धन या विद्यालयातून एकूण 40 विद्यार्थी प्रवीष्ट होऊन सर्व 40 विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक समिक्षा काशिनाथ पाटील 77 टक्के, द्वितीय क्रमांक सृष्टी मुरलीधर पाटील 76.20 टक्के, तृतीय क्रमांक श्रेया किशोर भोईनकर 72.80 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेतील सर्व प्रशालेच्या निकालाची उत्तम परंपरा यावर्षी देखील कायम राहील्याने उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे जनता शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष रवींद्र कुळकर्णी, सदस्य महम्मद मेमन, कार्याध्यक्ष सुकुमार तोंडलेकर, उपकार्याध्यक्ष नंदू पाटील, सचिव चंद्रकांत धनावडे, खजिनदार निवास गाणेकर तसेच सर्व संस्था सदस्य यांनी अभिनंदन केले.