• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मराठा समाजावरील अन्याय विरोधात महाडमध्ये मराठा समाजाचा मोर्चा

ByEditor

Sep 5, 2023

शिंदे ,फडणवीस ,पवार गट मोर्चा पासून अलिप्त?

मिलिंद माने
महाड :
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठी हल्ल्याच्या अत्याचाराच्या विरोधात महाडमध्ये मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढून महाड प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. परंतु, या मोर्चाला सत्ताधारी पक्षातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवार गटातील नेत्यांनी मात्र मोर्चा पासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

महाड तालुक्यातील रायगड, पाचाड ,नाते विभाग, वरंध, बिरवाडी वाळण, विन्हेरे करंजाडी, खाडीपट्टा विभाग दासगाव. महाड शहर या परिसरातून अनेक मराठा समाजातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या मोर्चाने बाजारपेठेतून मोर्चाद्वारे महाड प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांना निवेदन देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे सरकारकडे सादर केली.

महाड तालुक्यात मराठा समाजाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पक्षातील मराठा समाजातील तालुका अध्यक्ष यांच्यासह शिंदे गटातील विद्यमान आमदार भरत गोगावले व त्यांच्या समर्थकांनी तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटातील मराठा समाजातील पुढार्‍यांनी मोर्चाला आपली अनुपस्थिती दाखवल्याबद्दल मोर्चा मराठा समाजातील नागरिकांकडून त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी असल्याचे मोर्चादरम्यान नागरिकांकडून ऐकण्यास मिळाले आता तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत मते मागायला याच मग आम्ही तुम्हाला याचा जाब विचारतो अशा प्रतिक्रिया मराठा समाजातील अनेक मंडळींनी यावेळी बोलून दाखवल्या.

मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये चंद्रकांत बुवा जाधव ,पद्माकर मोरे. धनंजय देशमुख, श्रेयश जगताप, राजू रेवणे, सतीश सकपाळ, अशोक माने, श्रीधर सकपाळ, चेतन पोटफोडे ,अमित मोरे. राजेंद्र कोरपे, महेश महाडिक आदी मराठा समाजातील बांधव या मोर्चात उपस्थित होते. या मोर्चाच्या वेळी महाड मधील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला त्याचप्रमाणे पोलीस वर्गाने देखील मोर्चेकरी बांधवांना सहकार्य केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!