• Sat. Aug 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव तालुका आदिवासी भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

ByEditor

Aug 8, 2026

आदिवासी समाजाची ही वास्तू ‘चालती-बोलती’ असावी : खा. सुनील तटकरे

​माणगाव | सलीम शेख
आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी या वास्तूत विविध उपक्रमांचे आयोजन व्हावे. माणगावमधील हे आदिवासी भवन खऱ्या अर्थाने एक ‘चालती-बोलती’ वास्तू ठरावी, असे प्रतिपादन रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी केले.

​खासदार स्थानिक विकास निधीअंतर्गत जुने माणगाव शासकीय विश्रामगृहाजवळ उभारण्यात आलेल्या ‘माणगाव तालुका आदिवासी भवनाचा’ लोकार्पण सोहळा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

​आदिवासी समाजाचा विकास हाच मुख्य उद्देश : खा. तटकरे

​मार्गदर्शन करताना खा. तटकरे म्हणाले की, “माझ्या खासदार निधीतील ३० लाख रुपयांच्या निधीतून ही वास्तू साकारली याचा मला मनापासून आनंद आहे. जंगलचा राजा ही ओळख असणारा आदिवासी समाज आता मुख्य प्रवाहात येत आहे. व्यसनमुक्ती आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा होत असून शिक्षण क्षेत्रातही समाज पुढे जात आहे.”

​त्यांनी पुढे नमूद केले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजना आणि महिला बचत गटांच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांनी घ्यावा. तसेच वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेली जमीन आदिवासी बांधवांच्या नावावर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा शब्द देत त्यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

​वास्तू उभारणीत सर्वांचे मोलाचे सहकार्य : रमेश कोळी

​प्रास्ताविक करताना माणगाव तालुका आदिवासी समाजाचे नेते रमेश कोळी यांनी खा. तटकरे यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळेच ही वास्तू उभी राहू शकली. तटकरे साहेब हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे, असे मत व्यक्त करत त्यांनी सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

​या सोहळ्यास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुकाध्यक्ष काका नवगणे, ज्येष्ठ नेते शेखर शेठ देशमुख, आनंद यादव, गजानन अधिकारी, जि. प. सदस्या दिशा जाधव, जिल्हा युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी, उपसभापती मनीषा मालोरे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, संगीता बक्कम, अक्षय जाधव, उपनगराध्यक्ष रिया उभारे, शैलेश भोनकर, रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिनेश रातवडकर, लक्ष्मी हिलम, राजेंद्र शिर्के, ॲड. सुशील दसवते, सुनील पवार, विठोबा पालकर, जयंत बोडेरे, सिद्धांत देसाई आणि आदिवासी नेते रमेश कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पक्षाचे तालुका सरचिटणीस राजेंद्र शिर्के यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!