41वा वर्धापन दिन उत्साहात; नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड
उरण । घनःश्याम कडू
उरण तालुका मराठी पत्रकार संघाचा 41वा वर्धापन दिन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनी पत्रकार संघाच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संघाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी विरेश मोडखरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संजय गायकवाड होते. प्रारंभी संघाचा 41वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाच्या विविध विषयांवर चर्चा करून आगामी काळातील कामकाजाची दिशा आणि रणनीती निश्चित करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष घन:श्याम कडू, दिलीप कडू, रा. उ. म्हात्रे, सुयोग गायकवाड, अॅड. संघश्री गायकवाड, नमिता गायकवाड, दुर्वा गायकवाड, महेश गायकवाड आदी उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी विरेश मोडखरकर, उपाध्यक्षपदी दिलीप कडू, वैशाली कडू व नमिता गायकवाड, कार्याध्यक्ष घन:श्याम कडू, सचिव रा. उ. म्हात्रे, सहसचिव अजित पाटील, खजिनदार सुयोग गायकवाड, सह-खजिनदार महेश गायकवाड, सहसचिव दुर्वा गायकवाड, सदस्य हसमुख भिंडे, प्रविण कोलापटे यांची निवड करण्यात आली.तसेच मुख्य सल्लागारपदी दा. चां. कडू व संजय गायकवाड, तर कायदेशीर सल्लागारपदी अॅड. संघश्री गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष विरेश मोडखरकर यांचा माजी अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी पदभार सोपवून संघाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, पत्रकार संघटना अधिक मजबूत करणे तसेच समाजातील ज्वलंत प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी संघाच्या माध्यमातून कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि समाजहितासाठी संघ अधिक आक्रमकपणे कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
