विश्वास निकम
कोलाड : शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या तसेच शिक्षणाशिवाय खेळातही नंबर वन ठरलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षिका रिया रविंद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिक्षक दिनानिमित्त कला साधना सामाजिक संस्था कामोठे नवीमुंबई यांच्यावतीने राज्यस्तरीय ‘ग्लोबल बेस्ट टिचर अवार्ड’ देण्यात येणार आहे. यामध्ये ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांबच्या शिक्षिका रिया रविंद्र लोखंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी कराडी समाज हॉल, सेक्टर १४ कामोठे नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सन्माचिन्ह, सन्मानपत्र, मेडल व मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री नयन पवार, संदिप देसाई (सूत्रसंचालक टीव्ही ९ मराठी) हे उपस्थित राहणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मेघा महाजन यांनी सांगितले. या जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल रिया लोखंडे यांचेवर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
