• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्सच्या प्लांटना ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्दने ठोकले सील

ByEditor

Sep 6, 2023

देवेंद्र दरेकर
पोलादपूर :
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात बोगद्याचे काम करत असणाऱ्या ठेकेदार शिंदे डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या तीन प्लांटला ग्रामपंचायतचा कर थकवल्याच्या कारणावरून पोलादपूर तालुक्यातील भोगाव ग्रामपंचायतने अखेर सील ठोकले आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या बोगद्याच्या कामाला ब्रेक बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुधवारी सकाळीच अकरा वाजता भोगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका कदम, माजी सरपंच राकेश उतेकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम, धनरम चिकने, बंडू चिकने, नारायण कदम, प्रभाकर कदम, ग्रामसेवीका मेघना भोसले यांच्यासह प्रमुख ग्रामस्थ यांनीं शिंदे डेव्हलपर्स कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन कर थकवल्याच्या कारणावरून शिंदे डेव्हलपरचे प्लांट सील करण्यासाठी पोचले. यावेळी कंपनीचे सिद्धांत शिंदे, अमोल शिवतारे, एच. आर. करंडे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, पोलादपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, विस्तार अधिकारी धीवरे यांनी उपस्थित राहून यासंदर्भामध्ये भोगाव ग्रामपंचायत व शिंदे डेव्हलपर्स यांच्या कर थकवण्याच्या मुद्द्यावर तसेच बाधित केलेली भोगाव ग्रामपंचायतची पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते व मुख्य महामार्गावरून भोगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्याबद्दल असणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा केल्या.

यावेळी भोगाव ग्रामपंचायतने कराची रक्कम एकूण रकमेच्या 50% रक्कम भरण्याची मागणी केली.मात्र कंपनीने कोणत्याही प्रकारे ती रक्कम देण्यास नकार दिला फक्त पाच लाख रुपये भरण्याची त्यांनी तयारी दाखवली मात्र, गेली तीन वर्षे होऊ नये पाणीपुरवठा योजनेसारखी महत्त्वाची योजना या कंपनीने बाधित करून गावाला पाण्यापासून वंचित ठेवले आहे आणि ग्रामस्थ सकाळी गेले असताना त्यांना दोन तास कार्यालयात न बोलावता वयस्कर लोक असताना सुद्धा कंपनीने उन्हात उभे करून ठेवले. त्यामुळे चर्चेने कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर ग्रामपंचायतने शिंदे डेव्हलपर्सचे तीनही प्लांट सीलबंद करण्याची कारवाई चालू केली सदर प्लांट मध्ये एक जनरेटर , पेट्रोल पंपसह 3 प्लान्ट सीलबंद करण्यात आलेले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 रस्त्याचे काम पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावच्या हद्दीत चालू झाल्यापासून पाच वर्ष भोगाव खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हि समस्यांनी ग्रासली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या रुंदीकरणांमध्ये भोगाव खुर्द हद्दीतील नळ योजना ही पुर्णतः तोडली असून, ग्रामपंचायत भोगाव खुर्द हद्दीतील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच धामणदीवी ते भोगाव गावाच्या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था करून ठेवली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!