घन:श्याम कडू
उरण : उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष सुधाकर पाटील, चिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पेण तालुक्यातील शितोळे कातकरी वाडीवरील एकूण 26 कुटुंबांचे वन हक्क दावे आणि त्या सातबारा उताऱ्यांचे ऑनलाईन नोंदी करून अधिकृतरित्या आदिवासी बांधवांच्या हातात एक महिन्याच्या आत देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
सदर बैठकीसाठी उप विभागीय अधिकारी पेण प्रविण पवार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, वन अधिकारी कुलदीप पाटकर, भूमी अभिलेख विभाग प्रमुख बाविस्कर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आनंद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ॲड. धनंजय पाटील, महसूल अधिकारी, वन अधिकारी, पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते.
प्रा. राजेंद्र मढवी यांनी सुरवातीला प्रश्न मांडल्यावर तो मान्य करून सर्व अधिकाऱ्यांनी चर्चा मसलत करून संबंधित अधिकाऱ्यांना येत्या 15 दिवसात काम पूर्ण करण्याचे आदेश उप विभागीय अधिकारी यांनी दिल्यावर आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला.
