• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पालीत शिवसेनेच्या लाखमोलाच्या दहीहंडीचे माखन चाखले नागोठण्याच्या श्री जोगेश्वरी गोविंदा पथकाने

ByEditor

Sep 8, 2023

विनोद भोईर,
पाली :
तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आकर्षक दहीहंडी ठरली ती म्हणजे सुधागड तालुक्यातील पाली येथील आगरआळी मैदानात सुधागड तालुका शिवसेने आयोजित केलेली 1 लाख 1 हजार 111 रक्कमेची लाखमोलाची दहीहंडी. आणि या लाख मोलाच्या दहीहंडीचा मानकरी ठरला तो म्हणजे जोगेश्वरी गोविंदा पथक नागोठणे. या पथकाने उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवत सात मानवी मनोरे रचून ही लाखमोलाची मानाची दहीहंडी फोडली.

तसेच यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी गोविंदा रे गोपाला… गोविंदा आला रे आला…बोल बजरंग बली की जय…या गाण्याच्या ठेक्यांवर मानवी मनोरे रचून चौदा गोविंदा पथकांनी सलामी दिल्या. विशेष म्हणजे या दहीहंडीत उत्सवात म्हैसबाद खरपालेच्या महिला पथकांनी देखील शिस्तबध्दपणे सहा थरांची सलामी देऊन महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत हे त्यांनी यावेळी दाखवून दिले. यावेळी सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकास पाच हजार रुपये, तसेच स्थानिक तालुक्यातील गोविंदा पथकांना देखील पाच थरास पाच हजार रुपये रक्कम पारितोषिक देण्यात आले. यावेळी अविनाश झोरे दिग्दर्शित एव्ही डान्स स्टुडिओच्या मुलांनी विविध गणांवर डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्य कलाविषारांचे सादरीकरण करून उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, सुधागड तालुका प्रमुख रविंद्र देशमुख, उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी, युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, पेण सुधागड रोहा विधानसभा संपर्कप्रमुख संदीप दपके, युवा तालुका प्रमुख मनोज भोईर, नगराध्यक्षा प्रणाली शेळके, पाली शहर प्रमुख निखिल शहा, मंगेश पालांडे, शिवराम पवार, नगरसेवक विनायक जाधव, सुबोध पालांडे, सूरज शेळके, संदीप घाग, अमोल कांबळे, सरपंच रोहिदास साजेकर, संकेत दपके आदींसह शिवसेनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!