महाड पत्रकार संघ आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
मिलिंद माने
महाड : महाड जवळील कुर्ला दिवेकर वाडी येथे वनविभाग आणि महाड पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वांनी वृक्षरोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाचा संकल्प सोडला.
वृक्ष माणसाचे मित्र असून त्यांचे संवर्धन होण्याकरता अशा प्रकारचे उपक्रम गरजेचे आहेत असे मत यावेळी जमलेल्या सर्वांनी व्यक्त केले. महाड पत्रकार संघाच्या वतीने गेली दहा वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य जनजागृती असे उपक्रम प्रतिवर्षी आयोजित केले जातात. यावर्षी जून महिना कोरडा गेल्याने वृक्षारोपण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. वृक्षारोपणा बरोबरच पत्रकार संघातील सदस्यांना वृक्ष वाटप असा कार्यक्रम वनविभागाच्या सहाय्याने आयोजित करण्यात आला होता. महाड जवळील कुर्ला या ठिकाणी शुक्रवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वनविभागाचे अधिकारी राकेश साहू, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तरडे, गोविंद काळे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वन विभागाचे वन क्षेत्रपाल राकेश साहू यांनी वृक्ष संवर्धनाबाबत शासन आणि वनविभाग कायम प्रयत्नशील असल्याचे सांगून पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे सांगितले. ग्रामीण भागामध्ये वणवा लागण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. हे प्रमाण आटोक्यात आणणे आणि याकरता ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे आहे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. दरवर्षी वृक्षारोपण केले जाते मात्र त्याची जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना असणे गरजेचे आहे असे मत रवींद्र तरडे यांनी यावेळी व्यक्त केले. तर गोविंद काळे यांनी महाड पत्रकार संघाने घेतलेला उपक्रम इतरांना प्रेरणादायी असून वणव्यापासून वृक्षांचे संवर्धन करण्याकरता प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविकात महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत वृक्ष संवर्धनासाठी महाड पत्रकार संघ गेली काही वर्षांपासून खाजगी मालकीच्या जागेमध्ये वृक्षरोपण करण्याचा उपक्रम राबवला जात आहे हे स्पष्ट केले. या कार्यक्रमाकरिता वनविभागाचे वनपाल संजय चव्हाण, वनरक्षक प्रकाश जाधव, आदिनाथ कंठाळे यांच्यासह पत्रकार चंद्रकांत कोकणे, गोपाळ कांबळे, उदय सावंत, रोहित पाटील, रघुनाथ भागवत, राजेंद्र जैतपाल, निलेश लोखंडे, नितेश लोखंडे, मिलिंद माने, योगेश भामरे, अविनाश चील्हे, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक करबेलकर, दिलीप मुजुमले, ओंकार काळे, बावळेकर आदी उपस्थित होते.

I think the admin of this web page is in fact
working hard in favor of his web page, since
here every data is quality based material. ventanza.top
Have you ever thought about adding a little bit more than just your articles?
I mean, what you say is fundamental and all. Nevertheless think of if you
added some great images or videos to give your posts more, “pop”!
Your content is excellent but with pics and video clips, this website
could certainly be one of the very best in its field.
Awesome blog!
It’s nearly impossible to find educated people about this
subject, but you seem like you know what you’re talking about!
Thanks I saw similar here: Sklep internetowy
Hello there! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m
trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good results.
If you know of any please share. Many thanks! You can read similar article here:
Sklep internetowy