• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ता पदी शामकांत भोकरे तर सरचिटणीस पदी सुकुमार तोंडलेकर

ByEditor

Sep 10, 2023

प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या पक्षाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीमध्ये मुख्य प्रवक्ता पदी शामकांत भोकरे तर जिल्हा सरचिटणीस पदी सुकुमार तोंडलेकर याची नियुक्ती केली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र तटकरे श्रीवर्धन तालुक्याच्या दौऱ्यावर असताना देण्यात आले.

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाची घौडदौड जोमात सुरू असलेली रायगड मध्ये पहावयास मिळत आहे, प्रदेशाध्यक्ष तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे विकसाकमे भूमिपूजन करण्यासाठी श्रीवर्धन च्या दौऱ्यावर असताना बोर्ली पंचतन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ अध्यक्ष महमद मेमन यांच्या निवासस्थानी आले असता खासदार तटकरे यांनी रायगड राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ता पदी शिवसेना पक्षातून काहीच दिवसांपूर्वी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले धडाडीचे कार्यकर्ते व उत्तम संघटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाणारे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य शामकांत भोकरे यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी सुकुमार तोंडलेकर यांची नियुक्ती केली आहे. यावेळी महमद मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, मंदार तोडणकर, शहराध्यक्ष संतोष गायकर, सरपंच ज्योती परकर, माजी सभापती लाला जोशी, सुजित पाटील, अफझल मेमन ल, लक्ष्मण भाये, मोतीराम परबळकर, अक्रम साठविलकर व इतर उपस्थित होते

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!