• Sat. Aug 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दहीहंडी उत्सव कार्यकारिणीची घोषणा; मुकेश भोय अध्यक्षपदी

ByEditor

Aug 22, 2026

महेंद्र म्हात्रे (नागोठणे)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागोठणे शहरात भव्य दहीहंडी महोत्सवाच्या नियोजनासाठी काल शिवसेना शाखा कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. उप तालुका प्रमुख गणपत म्हात्रे, विभाग प्रमुख प्रकाश मेस्त्री आणि शाखा प्रमुख राजेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

मागील १५ वर्षांची प्रदीर्घ आणि अखंडित परंपरा कायम ठेवत, यंदाचा दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि जोशात साजरा करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२६ च्या दहीहंडी महोत्सवासाठी शिवसेना-युवासेना नागोठणे शाखेची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

नवीन दहीहंडी कार्यकारिणी:

  • अध्यक्ष: मुकेश भोय (संपर्क प्रमुख, नागोठणे शहर)
  • उपाध्यक्ष: नागेश सुर्वे
  • सेक्रेटरी: सलीम अत्तार
  • सह सेक्रेटरी: सुहेल पानसरे
  • खजिनदार: संजय पाटील
  • सह खजिनदार: विकास वादळ
  • कार्याध्यक्ष: इम्रान शेठ पानसरे आणि कैलास गोरे

सल्लागार मंडळ:

कीर्तिकुमार कळस, बाळू रटाटे, श्रीराम मांगले, सलीम शिंदी, चेतन कामथे, संदीप राऊत आणि अविनाश भोसले.

कार्यकारिणी सदस्य:

दीपक गायकवाड, मनोज कोळी, प्रवीण चितळे, राकेश चितळकर, शेखर जोगत, रुपेश जगताप, संदीप शिर्के, मोहन फोंडे, प्रसाद कोळी आणि स्वप्निल शिर्के.

नागोठण्यातील हा १५ वा पारंपरिक दहीहंडी उत्सव यंदाही मोठ्या दिमाखात साजरा होणार असून, सर्व शिवसैनिक व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष मुकेश भोय व संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!