• Sat. Aug 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये बापाकडूनच दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; माणगाव पोलिसांत गुन्हा दाखल

ByEditor

Aug 22, 2026

विशेष प्रतिनिधी / रायगड
बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सख्ख्या बापानेच आपल्या ११ आणि १४ वर्षीय दोन पोटच्या मुलींवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलींच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी बापाविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बाळाराम जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी बापाचे नाव आहे. आरोपीने ऑक्टोबर २०२४ ते जून २०२६ या कालावधीत म्हसळा तालुक्यातील पाभरा, तळा, माणगाव तसेच सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. पीडित मुलींनी या संदर्भात आईला आपबिती सांगितल्यानंतर हे भीषण वास्तव समोर आले.

​या प्रकरणी पीडितेच्या आईने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. आईच्या तक्रारीवरून माणगाव पोलीस ठाण्यात आरोपी बाळाराम जाधव याच्याविरोधात ‘पोक्सो’ (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून माणगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!