• Wed. Sep 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाली येथे श्री बल्लाळेश्वर देवस्थान व रुधिरसेतू सेवा संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबीर; ७७ रक्तदात्यांचा प्रतिसाद

ByEditor

Sep 2, 2026

पाली : श्री बल्लाळेश्वर देवस्थान, पाली आणि रुधिरसेतू सेवा संस्था, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (३० ऑगस्ट) भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पाली येथील भक्त निवास क्रमांक २ मध्ये सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबीराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू, तुळशीचे रोप आणि पाती चहाचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘रायगड भूषण’ पुरस्कारप्राप्त विश्वास गोफण यांच्या सौजन्याने सर्व सहभागी रक्तदात्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशवी भेट देण्यात आली.

शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ, कर्मचारी वर्ग आणि रुधिरसेतू सेवा संस्था, पनवेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांनी सर्व रक्तदाते आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!