किरण लाड
नागोठणे : येथील केएमजी विभाग गवळआळीतील ग्रामस्थ मोहन मारुती वादळ (वय ६८) यांचे आकस्मिक निधन झाले आहे.
कै. मोहन वादळ हे केएमजी विभागातील सामाजिक कार्यकर्ते होते. सयंमी, कमी बोलणारे वादळ यांनी मुंबई येथे 25 वर्षे प्रामाणिकपणे नोकरी केली. ते उत्कृष्ट वाहनचालक म्हणून विभागात परिचित होते. उभ्या आयुष्यात ड्रायविंग करताना त्यांच्या हातून कोणताही अपघात झाला नाही, याच्यावरुन त्यांचे वाहन चालविण्याचे कौशल्य दिसून येते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर तसेच केएमजी विभागावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीस केएमजी विभागातील ग्रामस्थ, नातेवाईक, गवळी समाजातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी मनिषा, दोन मुलगे विकास आणि दिनेश, विवाहित मुलगी रोहिणी, जावई, नातवंडे, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नागोठणे गवळआळी येथील राहत्या घरी होणार आहेत.
