• 76 ग्रामसेवकांच्या रिक्त पदामुळे प्रशासनाच्या कारभारावर अतिरिक्त ताण?
• ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे 95 टक्के ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने बरबटल्या?
मिलिंद माने
महाड : तालुक्यामध्ये एकुण १३४ ग्रामपंचायती असुन या पंचायतीच्या माध्यमांतुन गावांतील नागरिकांची महत्वाची शासकीय कामे केली जातात, परंतु राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असुन मागील दोन वर्षापासून 58 ग्रामसेवकांच्या हाती 134 ग्रामपंचायतींचा कारभार असून तालुक्यातील 76 ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त ग्रामसेवकांच्या पदांमुळे 95 टक्के ग्रामपंचायती भ्रष्टाचाराने बरबटल्या असल्याचे विदारक चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
ग्रामसेवकांच्या रिक्त पदांप्रमाणे विस्तार अधिकार्यांची तीन पदे असुन त्यापैकी एक पद रिक्त आहे. अश्याच प्रकारे अन्य विभागांमध्ये देखिल रिक्त पदे असल्यामुळे ग्रामिण भागांतील ग्रामपंचायतच्या प्रशासकीय कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला असुन रिक्त पदांमुळे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र महाड पंचायत समितीमध्ये पाहण्यात मिळत आहे.
शासनाच्या प्रत्येक विभागांमध्ये महत्वाची पदे गेल्या दोन वर्षापासून रिक्त असल्याने त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होत असुन सर्व सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील प्रसायकीय कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. शासनाच्या प्रत्येक विभागांमध्ये महत्वाची असणारी सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे होत नाहीत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेची अक्षरश: शासनाकडून पिळवणुक केली जात आहे. तालुक्यामध्ये १३४ ग्रामपंचायती आहेत त्याचबरोबर महसुली गावांची संख्या 188 आहे. महाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाची लोकसंख्या 2011 च्या तुलनेत 138955 असून पुरुष 91457 तर स्त्रिया 88374 आहेत. तर महाड तालुक्याचे क्षेत्रफळ 796.67 चौरस किलोमीटर आहे. महाड तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण 81.90% आहे. यामध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण 79.46% तर महिला साक्षरतेचे प्रमाण 67.22% त्याचप्रमाणे सहा वर्षाखालील बालकांची संख्या19044 तर सहा वर्षापर्यंत मुलांची संख्या 9787 व मुलींची संख्या 9257 आहे. महाड तालुक्यात नऊ मंडल असून तलाठी सजाची संख्या 51 आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे अनेक गावांतुन जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील पदे रिक्त असल्यामुळे सर्वसामान्यांना अर्थिक नुकसानी बरोबर तालुक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी यावे लागत असल्याने नाहक वेळ व पैसा खर्च होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
महाड तालुक्यातील ग्रामसेवकांच्या हाती कोणत्या ग्रामपंचायतीचा कार्यभार आहे त्याची यादी पुढील प्रमाणे;
| ग्रामसेवकाचे नाव | ग्रामपंचायत | मोबाईल क्रमांक |
| प्रवीण बाळाराम शिंदे (ग्रामविस्तार अधिकारी) | दासगाव, पडवी, तळीये | 8805624688 |
| प्रदीप संभाजी महामुंणकर (ग्रामविस्तार अधिकारी) | खरवली | 7507093176 |
| अन्या महादू दरवडा | वाघोली दहिवड, मांगरूण | 9850524761 |
| नितेश मच्छिंद्र सातव | चाडवे खुर्द | 8087999888 |
| शिवाजी दादासाहेब बंडगर | कांबळे तर्फे बिरवाडी, रानवडी खुर्द | 9922693181 |
| संदीप अरविंद बागडे | तळोशी ,वरणडोली, नांदगाव खुर्द | 9422693181 |
| गोरक्ष निवृत्ती देशमुख | मु मुशी, किये निगडे, पिंपळकोंड | 8087122874 |
| भाविका भरत कदम | कोकरे तर्फे नाते कोंझर | 7517234051 |
| आला शिंग भिका राठोड | विन्हेरे भोमजई, घावरे कोंड ,रावतळी | 9420338326 |
| सुभाष दत्तात्रेय चव्हाण | गोठे बुद्रुक ,सिंगर कोंड | 942160207 |
| सुशांत तुकाराम चिले | नडगाव तर्फे बिरवाडी, चांभार खिंड | 9881418184 |
| प्रकाश सुंदर नाडकर | जिते ,धामणे | 8975821082 |
| विशाखा वासुदेव सोंडकर | शिरसवणे, शिरवली | 9028748264 |
| रत्नाली रविचंद्र मालगुणकर | दादली, उंदेरी | 8087585827 |
| वैशाली गोविंद नागे | सोनघर, कुंबळे | 7666591927 |
| नितीन अंकुश पवार | कोंडीवते | 8208295534 |
| चंद्रकांत सजनू कदम | कोळसे, नांदगाव बुद्रुक | 8805452471 |
| चंद्रकांत दामू अर्बन | टोळ बुद्रुक ,केभुर्ली | 9049728861 |
| गायत्री सुभाष गीर | गोसावी रेवतळे, कावळे तर्फे विन्हेरे, नागाव | 9404794564 |
| आर. एस. पवार | अधिस्ते, वलंग शिरगाव | 8087882778 |
| परमेश्वर तुकाराम तिडके | नरवण खुटील, भेलोशी | 8805483253 |
| बळीराम व्यंकटराव मंगनाळे | सवाने | 9960004647 |
| अजित वसंत पोळेकर | आडी ,वीर | 7249022409 |
| अंजनाबाई नरहरी खरात | धुरूपकोंड कुरले | 9028502878 |
| मंजुषा मधुकर खोपडे | पार्माची ,भावे | 8805849679 |
| राखी रविकांत बुटाला | चाडवे बुद्रुक, वडवली, चोचिंदे | 9404992241 |
| मीनाक्षी सुरेश मोहिते | शेल, आकले, कांबळे तर्फे महाड | 8668856578 |
| किशोर गेनू मांडवकर गोंडाळे | मोहपरे ,आचलोली, कुंभे शिवथर, कसबे शिवतर आंबे शिवतर | 9850700567, 7278017043 |
| विजय दगडू जाधव | निजामपूर, नेराव, बावळे | 7276817077 |
| जयमला जगन्नाथ पाटणे | करंजखोल, किंजळोली बुद्रुक | 9420057316 |
| सतीश भास्कर चेंडके | लाडवली, वरद, बारसगाव | 9403934520 |
| सिद्धी शेखर पाटेकर | सव, रावढळ, नडगाव तर्फे तुढील | 9975658836 |
| अंबालाल धाकल्या बागुल | जुई बुद्रुक, चिंबावे, राजेवाडी | 9527025298 |
| नागनाथ अरुण घाडगे | आमशेत, वहूर, बिरवाडी | 9594446286 |
| योगिता रमेश पलंगे | कोंल, साकडी, कोठेरी | 7083047473 |
| संजय लक्ष्मण जाधव | पाचाड, पुनाडे तर्फे नाते, कोथुर्डे | 8698640095 |
| सुवर्णा धावजी उंबर | साडा नाते, चापगाव | 8408997928 |
| विनायक काशिनाथ मेंडके | मोहोत, कुसगाव, पिंपळवाडी, रुपवली | 9503559123 |
| प्रसाद गोंधळी | काचले, किंजळोली खुर्द | 9527029364 |
| प्रवीण बुल्लू वामने | कुंभार्डे ,आंबिवली बुद्रुक, अंबावडे | 7066732097 |
| भीमराव संभाजी पंडित | मांडले, खर्डी | 8329409629 |
| कैलास ईसऱ्या राऊत | तेलंगे ,तेलंगे मोहल्ला | 7588734749 |
| गजानन गाढवे | पंदेरी, नातोंडी ,दापोली | 9637221531 |
| अनिल रमेश तांकपेरे | करंजाडी, पांगारी, बीजघर | 7218555173 |
| महादेव नारायण मोरे | वाकी बुद्रुक, वारंगी, पाने | 9552608004 |
| संजय विलास साळे | अप्परतुडील, लोअर तुडील | 9022622883 |
| महादेव निवृत्ती भरगुडे | ताम्हणे, फाळकेवाडी, वसाप | 7757810243 |
| संतोष रामदास तायडे | आसनपोई, तेठघर. | 7798599951 |
| मोतीसिंग लहानोजी भस्मे | वराठी ,चिंबावे मोहल्ला | 9922462582 |
| राजकुमार सदाशिव जाधव | 9403091135 | |
| उद्धव सखाराम केदार | राजीवली | 7350617777 |
| मयूर कांबळे | वाळण बुद्रुक | 8956030487 |
| स्वप्निल नगरकर | दाभोळ | 9004992242 |
| अश्विनी दत्तात्रेय काळे | किंजलघर | 9850145768 |
| नयन पाटील | गांधारपाले | 9076902273 |
| मनीष कदम | सादोशी, सावरट | 9403313971 |
| अनिल रमेश मोरे | वाळसुरे | 9552887348 |
शासकीय कामानिमित्त कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारुनही कामे होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून केल्या जातात परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी त्याचबरोबर उच्च पदस्थ अधिकारी सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्याऐवजी अपमानास्पद वागणूक ग्रामीण भागातील नागरिकांना देत आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येते.
महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना आपली गाव पातळीवर कामे पुर्ण होण्याकरीता ग्रामसेवकाचे पद नियुक्त करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून जन्म मृत्यु दाखला, रहिवासी दाखला, बांधकामाचे परवाने त्याचबरोबर कर वसुली, गावातील स्वच्छता, दिवाबत्ती इत्यादी महत्वाची कामे केली जातात. गाव पातळीवर मुलभूत सुविधांकडे लक्ष देण्याचे महत्वाचे काम ग्रामसेवकाकडे देण्यांत आलेले आहे. परंतु, प्रत्यक्षांत तालुक्यामध्ये 76 ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्यामुळे एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार गावांचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. हे ग्रामसेवक चार चार पंचायतीमधुन काम करीत असल्याने नागरिकांना मात्र ग्रामसेवकाची भेट होणे शक्य होत नाही. त्यातच ग्रामसेवक हे एखाद्या ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती असताना त्या ग्रामपंचायती क्षेत्रातील रहिवाशांना आपला मोबाईल नंबर एक देतात तर दुसऱ्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना दुसरा मोबाईल नंबर देतात प्रत्यक्षात मात्र दोन्ही नंबर बंद करून आपला कार्यभार हाकण्याचे काम ग्रामसेवक करीत असल्याने ग्रामपंचायत पातळीवरील नागरिकांची कामे महिनो न महिने रखडत असल्याचे चित्र महाड तालुक्यातील ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.
एकेका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्याने अनेक ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये आठ ते दहा दिवस फेरफटका देखील मारत नाहीत. अनेक ग्रामपंचायतीत प्रशासकीय कारभार असल्याचा गैरफायदा घेऊन अनेक ग्रामसेवक कामावर गैरहजर राहतात. परिणामी नागरिकांची कामे ठप्प झाली आहेत. याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करून देखील कोणताही उपाय यावर केला जात नाही.
ज्या लोकप्रतिनिधींना ज्या नागरिकांनी निवडून दिले ते लोकप्रतिनिधी देखील नागरिकांना वाऱ्यावर सोडत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न महाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. तालुक्यातील जनतेच्या तक्रार अर्जाला पंचायत समितीमध्ये केराची टोपली दाखविली जात असल्याने तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या महसुल विभागाप्रमाणे शासनाच्या प्रत्येक विभागांतुन शेकडो पदे रिक्त आहेत. अश्या रिक्त पदांचा सरकारी कामावर विपरीत परिणाम होत असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्ता मिळविण्याच्या नादात आहेत. प्रशासनाकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये सर्व सामान्यांच्या कामाबाबत उदासिनता आहे. महाड तालुक्यामध्ये असलेल्या ग्रामसेवकांची पदे त्वरीत भरण्यात यावीत अशी मागणी ग्रामीण भागांतुन होत असताना मात्र नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करीत आहेत.
तालुक्यातील ग्रामसेवकांवर अंकुश ठेवण्याचे काम गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असते. मात्र, महाड तालुक्यात मागील तीन वर्षापासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या हाती महाड पंचायत समितीची दोरी असल्याने संबंधित प्रभारी गटविकास अधिकाऱ्याला देखील कोणतेही गांभीर्य पडलेले नसल्याने त्याचाच फायदा ग्रामसेवक घेत असून तालुक्यातील 134 ग्रामपंचायत पैकी 95 टक्के ग्रामपंचायती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत महाड पंचायत समितीमध्ये तक्रार दाखल होत आहे. मात्र त्या तक्रारीची ना लोकप्रतिनिधी दखल घेत ना प्रशासकीय अधिकारी त्यामुळे ग्रामसेवकांना मोकळे रान मिळाले आहे.
