वैशाली कडू
उरण : करंजा-रेवस या जलमार्गावरील तिकीट दर १० रुपयांनी महागले आहे. यामुळे प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे. या मार्गावरून जलप्रवास करण्यासाठी २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. त्यामध्ये मंगळवारपासून १० रुपये वाढ केल्याने आता या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
करंजा-रेवस या जलमार्गावरून स्वस्त, मस्त व कमी पैशात प्रवास करता येत होता. त्याचबरोबर वेळेचीही बचत होत होती. करंजाहुन १० ते १५ मिनिटात रेवस धक्क्यावर पोहचणे शक्य होत होते. यामुळे दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करीत आहेत. हा प्रवास सुखकर होत असल्याचे प्रवासी सांगतात. परंतु १० रुपयांची वाढ केल्याने आता प्रवासासाठी ३० रुपये मोजावे लागणार असल्याने प्रवाशी वर्गात नाराजीचा सूर निघत आहे.
