वैशाली कडू
उरण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याच्या महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका मनीषा नितीन ठाकूर यांची पालघर जिल्ह्याच्या सहा विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हानिहाय वक्ता या पदावर नियुक्ती करून त्यांच्याकडे पालघर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेना प्रवक्ते अनिस गाढवे यांच्या सूचनेनुसार शिवसेनाभवनमधून ही नियुक्ती होताच उरण उपतालुका संघटिका मनीषा नितीन ठाकूर यांनी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी मनीषा ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे व शिवसेना पक्षातील त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
