• Sat. Feb 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे येथील लक्ष्मीबाई पाटील यांचे निधन

ByEditor

Sep 16, 2023

किरण लाड
नागोठणे :
येथील केएमजी विभाग गवळआळीतील ग्रामस्थ लक्ष्मीबाई नारायण पाटील यांचे वयाच्या 78 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

कै.लक्ष्मीबाई पाटील या शांत, सयंमी स्वभावाच्या होत्या. उभ्या आयुष्यात त्यांनी कधी कोणाशी भांडण केले नाही. अतिशय कष्टाळू, मेहनती असल्याने आपले काम बरे आणि आपण बरे या उक्तीने त्यांनी आपल संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. चालत्या,बोलत्या लक्ष्मीबाई अचानकपणे सोमवार, दि. 11 सप्टेंबर रोजी सर्वांना सोडून गेल्या. त्यांच्या अंत्यविधीस केएमजी विभागातील ग्रामस्थ, नातेवाईक, समाज तसेच विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या अचानक जाण्याने कुटुंबावर तसेच नातेवाईक व गवळ आळीतील ग्रामस्थ यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती नारायण, मुलगा कै. गणेश यांची पत्नी, मुले, दुसरा मुलगा प्रभाकर, त्यांची पत्नी,,मुले, विवाहित मुलगी संगीता नाकते, जावई, नातवंडे, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. कै.लक्ष्मीबाई पाटील यांचे दशक्रिया विधी केएमजी विभागातील दशक्रिया शेड येथे होणार आहेत. तसेच उत्तरकार्य नागोठणे गवळ आळीतील राहत्या घरी होणार आहेत. या दोन्ही विधी एकाच दिवशी म्हणजेच बुधवार दि. 20 सप्टेंबर रोजी होणार आहेत अशी माहिती त्यांचे पुतणे मनोज पाटील यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!