विश्वास निकम
कोलाड : कोलाड परिसरात ऐन गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी वारंवार विज पुरवठा खांडीत झाल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोलाड परिसरातील गोवे, पुई, पुई आदिवासी, महाडिक फार्म हाऊसच्या आजूबाजूला ऐन उत्सवाच्या पहिल्या दिवशी वारंवार विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे याचा नाहक त्रास या परिसरातील नागरिकांना होत आहे. याविषयी विज पुरवठा अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही तुमची सारखी कामे करायची काय? अशी कर्मचारी वर्गाकडून उडवाउडवी उत्तरे दिली जात आहे? अगोदर महागाईने जनता पूर्णपणे होरपळत असुन त्यात भरीत भर म्हणून प्रचंड वीज दरवाढीमुळे वीजग्राहक पुर्णपणे मेटाकुटीला आले आहेत. यामध्ये ऐन गणेश उत्सवात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, दाब कमी जास्त होणे यामुळे टीव्ही, फ्रीज, व इतर विद्युत उपकरणावर परिणाम होत असुन टीव्ही, फ्रीज बंद पडत आहेत याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून केला जात आहे.
कोलाड परिसरात वारंवार वीजखंडित होत असल्यामुळे याविषयी अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून असे सांगण्यात येत आहे कि, आम्ही तुमचीच कामे करायची काय? आम्हाला फॉल्ट सापडत नाही. मग हे कर्मचारी वीजवितरण कंपनीचे काम शिकलेले आहेत कि नाही?
-निलेश महाडिक
सामाजिक कार्यकर्ते
