५ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या वर्ल्ड कप ट्रॉफीचा ‘फस्ट लूक’
घन:श्याम कडू
उरण : पूर्ण हिंदुस्थानची जनता ज्या वर्ल्ड कप क्रिकेट मॅच बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे त्या मॅचचे मुख्य आकर्षण असणारी ट्रॉफी यापूर्वीच तयार करण्यात झाली असून ती सध्या विविध महत्वाच्या ठिकाणी फिरविण्यात येत आहे . या ट्रॉफीचे मुख्य प्रायोजक असलेल्या डीपी वर्ल्ड बंदराने चालवायला घेतलेल्या उरणच्या काँटिनेंटल सीएफएसमध्ये ती आज आणण्यात आली होती. अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि कडेकोट सुरक्षेत आणण्यात आलेल्या या वर्ल्ड कप ट्रॉफीची झलक तेथील कामगारांच्या मोबाईलमध्ये कैद झाली असून आमच्या वार्ताहराने ती मिळवली आहे. येत्या ५ ऑक्टोबर रोजी ह्या वर्ल्ड कपचा धमाका सुरू होणार असून वर्ल्ड कप पाहण्यासाठी देश विदेशातील क्रिकेट प्रेमी आतुर असल्याचे चित्र आहे.

हिंदुस्थानात पुढील महिन्यापासून वर्ल्ड कपच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या जगभरातील क्रिकेट संघाची आणि क्रिकेट प्रेमींच्या औत्सुक्याचा विषय म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्या जाणाऱ्या संघाला दिली जाणारी वर्ल्ड कप ट्रॉफी असते. ही ट्रॉफी नुकतीच उरणच्या खोपटे गावातील कॉंटिनेंटल गोदामात आणण्यात आली होती. अत्यंत आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या वर्ल्ड कप ट्रॉफीला सोन्याचा मुलामा देऊन तिला अधिकाधिक पद्धतीने सुंदर करण्यात आली असल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.
