विश्वास निकम
गोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाला जोडलेल्या खांब पालदाड मार्गाची अवस्था अगदी बिकट झाली आहे. गेली अनेक वर्षे या रखडलेल्या मार्गाला जबाबदार कोण? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. गेली अनेक वर्षे या मार्गाच्या दुरस्तीकडे बांधकाम खाते, लोकनेते दुर्लक्ष करीत आहेत. या मार्गाचे काम मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत केलेले काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. हे काम का रखडले आहे याचे कारणही गुलदस्त्याच आहे. या रस्त्यासाठी येथील नागरिकांनी अनेदा संघर्ष केला. मोठ मोठे खड्डे, मार्गालगत वाढलेली काटेरी झुडपे त्यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.
भयानक वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे पुढील वाहनेच दिसत नाहीत तर अरुंद रस्त्यामुळे समोरासमोर वाहने आली की कोणतीतरी एका वाहन चालकांना वाहन मागे घ्यावे लागत आहे. खांब नडवली तळवली मार्ग काटेरी झुडपात हरवला आहे तर धानकान्हे देवकान्हे दरम्यान व उडदवणे पालदाड पुलाकडे जाणारा मार्ग खड्ड्यात गेला आहे. अरुंद मार्ग असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील काही वर्षांपूर्वी या रस्त्याची थातुरमातुर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र आता या मार्गाची दयनीय अवस्था पाहावयास मिळत आहे.

मागील सहा सात वर्षांपूर्वी खांब निडी तर्फे अष्टमी या मार्गाचे काम मुखमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत करण्यात आले परंतु, ते काम निडी ते देवकान्हे या दरम्यान केले गेले देवकान्हे खांब हे चार ते पाच किलोमीटर अंतरावरील काम हे अद्याप रखडलेले आहे. त्यामुळे हा मार्ग सध्या धोकादायक बनला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणची रस्त्यांची कामे विविध योजनेंतर्गत मार्गी लागली असून खांब देवकान्हे तसेच उडदवणे पालदाड मार्गाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत का आहे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षाचा आढावा घेतला तर एकही वर्ष असे गेले नाही की मंत्रिमंडळात रायगड जिल्ह्यातील मंत्री नाही तरी देखील विकासापासून हा भाग वंचीत राहिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या मार्गाच्या अर्धवट असलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधी आतातरी लक्ष देतील का? असा सवाल येथील स्थानिक नागरिक विचारीत आहेत.

रस्त्याची दुरुस्ती कधी होतच नाही माञ दुरुस्तीचे आश्वासन कायम तर काही ठिकानी खड्डे न भरता आणतात आव याला करायचे काय त्यामुळे त्यामुळे येथील नागरिकांची खड्डेमय रस्त्याची घरघर कायम . तरी संबधित अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेत रस्त्यालगतची वाढलेली काटेरी झुडपे व रस्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे ,
