अमूलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यासहित सर्वत्र स्वच्छ्ता अभियान राबवित असताना अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्र किनारी चरसची दहा पाकिटे सापडली असल्याची माहिती अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली आहे.

अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वरसोली समुद्र किनारी सापडलेल्या दहा पाकिटे अमली पदार्थ सापडले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरसोली समुद्र किनारी मिळून आलेली प्लास्टिक पिशवीची पाकिटे त्यावर समोरील बाजूस मध्यभागी गोल आकारात गरुडाचे व नागाचे चिन्ह व त्याच्या बाजूला इंग्रजीमध्ये AFGHAN PRODUCT असे लिहिलेले दिसत होते व सदर पाकिटावर उर्दू लिपीमध्ये छापील अक्षरे असलेली तसेच वरील प्लास्टिकचे आवरणाच्या आतमध्ये नक्षीदार प्लास्टिक आवरण पाकीट असलेले व सदर पाकिटावर इंग्रजीमध्ये LIMITED EDITION व STARBUCKS HOLIDAY BLEND एकूण नऊ प्लास्टिक पिशवीची पाकिटे व काही फाटलेल्या पाकिटमधून बाहेर येऊन तुकडे पडून वाळूमध्ये पसरलेला हिरवट काळसर रंगाचा पदार्थाची दहा पाकिटे चरस नावाचा अमली पदार्थ असलेला मुद्देमाल मिळून आला. LONG GRAIN PARBOILED BIRYANI RICE PRIMIUM QUALITY SPECIALLY PACKED FOR PRODUCE OF PAKISTAN असे लिहीलेला मुददेमाल सापडला.