सक्षम व कार्यतत्पर नेतृत्व मिळाल्याने कार्यकर्ते आनंदीत
शशिकांत मोरे
धाटाव : दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा रोठ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमित घाग यांची रोहा तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील व दक्षिण रायगड संघटक मंत्री सतीश धारप यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी नियुक्ती केली तर तालुक्याला सक्षम असे नेतृत्व मिळाल्याने तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रोहा तालुका हा रायगड जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या केंद्रबिंदू मानला जातो. त्याच तालुक्यातून दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग धुरा सांभाळत असताना जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक काम, विविध सामाजिक उपक्रम, अनेक आंदोलने करीत असताना रोहा तालुक्यामधील बलाढ्य अशा किल्ला व तळवली दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच तसेच रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीवर सत्ता असुन तिथे उपसरपंच भाजपाचा आहे तर ढोणखार, खैराले या सारख्या ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आणून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. यापूर्वी भाजपा पक्ष संघटनेने संपर्काचे चांगले काम केले आहे. एकूणच संघटना बांधण्याच्या दांडग्या अनुभवाचा फायदा तालुका भाजपा संघटनेला होईल .
तालुका अध्यक्ष नियुक्तीनंतर अमित घाग म्हणाले की, रोहा तालुक्यातील सर्व गावागावांमध्ये, वाड्या वस्तीमध्ये भाजपाच्या बूथ कमिट्या, शक्ती केंद्र प्रमुख करून संघटनात्मक बांधणी केली केले जाईल. त्याचबरोबर वरिष्ठांनी दिलेल्या तालुका अध्यक्ष पदाच्या संधीचे प्रामाणिकपणे काम करून पक्ष पुढील काळात जोमाने वाढविण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन माझ्याकडून होईल तसेच आगामी सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकतीने उतरून तालुक्यात क्रमांक एकचा पक्ष असेल असा विश्वास अमित घाग यांनी व्यक्त केला.