किरण लाड
नागोठणे : श्री कानिफनाथ नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी मराठाआळी येथील दिपक उर्फ बाबू मारुती भगत यांची एकमताने निवड करण्यात आली. श्री कानिफनाथ नवरात्रौत्सव मंडळ कुंभारआळी, मराठाआळी कमिटीची सभा श्री कानिफनाथ मंदिर येथे सोमवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. सन 2012 साली श्री कानिफनाथ नवरात्रौत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश लाड व उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर व सर्व सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या मंडळाचे यंदा 13वे वर्ष आहे. श्री कानिफनाथ नवरात्रौत्सव मंडळ उत्सव काळात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करीत असते तसेच उत्सव काळात दहा दिवसाच्या कार्यक्रमाची रेलचेल असते. श्री कानिफनाथ मंदिरासमोर रोज रात्री मोठ्या प्रमाणावर पुरुष, युवा, महिला भगिनी गरबा खेळण्यासाठी येत असतात.

सर्व नियमांचे पालन करणारे नागोठणे विभागातील प्रसिध्द अशा श्री कानिफनाथ नवरात्रौत्सव मंडळाच्या उपाध्यक्ष पदी सारंग मारुती घोसाळकर, सचिव गौरव मोहन नागोठणेकर, खजिनदार पदी सुमित रघुनाथ जाधव, सहसचिव पदी संकेत अनिल लाड यांची तर सहखजिनदार पदी गणेश नारायण तळदेवकर, कार्याध्यक्ष पदी प्रमोद वसंत नागोठणेकर व रुपेश बाळाराम पोटे यांची तर मंडळाच्या सल्लागार पदी उदय रघुनाथ लाड व रुपेश रमेश नागोठणेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. श्री कानिफनाथ नवरात्रौत्सव मंडळाचे मावळते अध्यक्ष वैभव ज्ञानेश्वर चितळकर यांनी उत्सव काळात केलेल्या चांगल्या व भव्य कार्यक्रमाबद्दल त्यांचा कमिटी व ग्रामस्थांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. श्री कानिफनाथ मंदिर मराठाआळी येथे आयोजित केलेल्या नवरात्रौत्सव मंडळाच्या मिटींगसाठी अमित पवार, विपूल हेंडे, संदेश पोटे, स्वप्नील भोसले, संदेश जाधव, गौरव वाघमारे, सतिश लाड, निखिल जाधव, गितेश पोटे, किरण चाचले, विशाल चाचले, मयुर वाघमारे, ऋषिकेश चितळकर, संचित भगत तसेच मंडळाचे आजी, माजी पदाधिकारी, सभासद,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.