• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

५ ऑक्टोबरपर्यंत E-KYC न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ नाही, रोहा कृषी विभागाकडून विशेष मोहीम

ByEditor

Oct 2, 2023

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर सध्या शेतकरी १५वा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. परंतु, पात्र लाभार्थ्यांचे ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार सलग्न करणे व भुमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत. शासनाच्या सुचनेनुसार लाभार्थ्यांनी गुरुवार, दि. ५ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करणार नाहीत तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतुन वगळण्यात येणार असल्याचे रोहा तालुका कृषी अधिकारी तसेच त्यांच्या कार्यालयातून यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे .तर यासाठी तालुका स्तरावर विशेष मोहीम विभागाकडून राबवली जात आहे.

रोहा तालुक्यातील ९०३७ शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत तर ५८३ लाभार्थीची ई-केवायसी तर १३११ लाभार्थीची आधार सिडिंग प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. मागील अनेक महिन्यापासून ते आजपर्यंत या संदर्भात गावस्तरावर लाभार्थी यांना तसेच शेतकऱ्यांना विभागीय कृषि अधिकारी वर्गांकडून वारंवार आवाहन करूनही केवायसी अपडेट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे तर अधिक शेवटची तारीख गुरुवार, दि. ५ ऑक्टोबर ही केवायसी व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवरून लाभार्थी सूचीतून अशा या लाभार्थ्यांची नावे वगळली जातील व योजनेच्या लाभापासून वंचित राहण्यास संबंधित खातेदार शेतकरी हे स्वतः जबाबदार राहतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच ती लवरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

ई केवायसी अपडेट करण्याकरीता मोबाईल फोनवरुन ओटीपी बेस, सामाईक सुविधा केंद्र मार्फत व मोबाईल फोनवरुन पीएम किसान गुगल अॅपव्दारे चेहरा पडताळणी/प्रमाणिकरण हे तीन पर्याय आहेत. बँक खाते आधार सलग्न करण्याकरीता इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडणे, स्वतःचे बँक खाते आधार सलग्न करणे या बाबींचा वापर करुन पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल. केवायसी प्रलंबित लाभार्थ्यांची नावे ग्रामपंचायत, संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्न करण्यासाठी काही अडचण असल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधिकारी तसेच सहाय्यक अधिकारी यांनी केले आहे. पीएम किसान योजने अंतर्गत ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्नीकरण हे शेवटी येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत करण्यात यावे. अन्यथा या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची नावे रद्द करण्याची कार्यवाही शासन स्तरावरून केली जाईल याची सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घ्यावी. तसेच या योजनेपासून कोणीही लाभार्थी शेतकरी वंचित राहू नये यासाठी येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत पीएम किसान योजनेचे केवायसी करण्याचे आवाहन रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!