• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सिप्ला कंपनीत भारतीय मजदूर संघाने केला वेतनवाढीचा करार

ByEditor

Oct 5, 2023

विठ्ठल ममताबादे
उरण :
खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला कंपनीच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन वाढीचा करार भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघ आणि सिप्ला कंपनी यांच्यात नुकताच संपन्न झाला. या कराराद्वारे कामगारांना रुपये 15800/- एवढी वाढ दरमहा मिळणार आहे. यापैकी 50 टक्के रक्कम ही मूळ वेतन आणि अन्य रक्कम विविध भत्त्यांमध्ये दिली जाईल. कराराचा कालावधी एप्रिल 2023 पासून तीन वर्षाचा राहील.

कंपनीच्या वतीने एचआर हेड अनिरुद्ध कुंटे, प्लांट हेड पराग देशमुख, एचआर मॅनेजर विनायक काळे, श्री वेदराज यासह युनियनच्या वतीने जनरल सेक्रेटरी ॲड. अनिल ढुमणे, अशोक निकम, दामोदर जोशी, महादेव कचरे, बागडे पाटील, संजय लाड, गणेश आंबवणे, रवींद्र वळंजू, अनिल जाधव यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी भारतीय मजदुर संघ रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते. सदरचा करार हा विक्रमी वेळेत म्हणजे केवळ चार महिन्यात संपन्न झाला. त्याबद्दल संघटनेच्यावतीने व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले. या करारामुळे कामगारांचे वेतन ६२ हजारच्या पुढे जाणार आहे. करार झाल्यानंतर कारखान्यातील सर्व कामगारांनी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार केला. पेढे वाटून कारखाना गेटवर अन्य कारखान्यातील कामगारांसह आनंद उत्सव साजरा केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!