शामकांत नेरपगार
नागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागले असून नागोठणे ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात भाजपच्या नागोठणे कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर व जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचासह सर्व १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पुढील दिशा ठराविण्यात येणार असून निवडणुकीसाठी भाजप पूर्ण तयारीनीशी सज्ज असल्याची माहिती रोहा तालुका महामंत्री आनंद लाड यांनी रायगड जनोदयशी बोलताना दिली. दरम्यान, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी भाजप नेते सोपान जांबेकर व श्रेया कुंटे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली असल्यामुळे या बैठकीत त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनिर्वाचित दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत रोहा तालुका महामंत्री आनंद लाड, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, ज्येष्ठ कार्यकर्ते विवेक रावकर, सिराज पानसरे, जि. प. गण अध्यक्ष शेखर गोळे, उत्तर भारतीय सेल जिल्हा अध्यक्ष राजन दुबे, शिक्षण सेल रोहा ता. अध्यक्ष अशोक अहिरे, उपाध्यक्ष धनराज उमाळे, तिरत पोलसानी, पप्पू सिंग, माधुरी रावकर, प्रियांका पिंपळे, शितल नांगरे, निलिमा राजे, सोनी पांडे, निता वढावकर, मुग्धा वढावकर, सुखदा वढावकरआदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
