• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रसोल कंपनीवर ठोस कारवाई करा युवा सेनेची मागणी!

ByEditor

Oct 6, 2023

मिलिंद माने
महाड :
महाड औद्योगिक वसाहतीमधील 5 ऑक्टोबर रोजी प्रसोल कंपनीत वायू गळती होऊन एक कामगाराचा मृत्यू तर चार जण गंभीरित्या जखमी झाल्याप्रकरणी या कंपनीवर ठोस कारवाई करण्याची मागणी दक्षिण रायगड युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे यांनी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल कंपनीमध्ये 5 ऑक्टोबर रोजी सकाळी वायू गळती होऊन एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चार कामगार गंभीररित्या जखमी झाले असून या कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. या कंपनीत झालेली वायू गळती ही तिसऱ्यांदा झाली असल्याने या प्रकाराला पूर्णपणे कंपनी व्यवस्थापन जबाबदार आहे. वारंवार कंपनीमध्ये होणारे अपघात पाहता कंपनी निरीक्षक व कंपनीचे व्यवस्थापन जबाबदार असून यावर ठोस कारवाई होण्याची गरज असल्याचे दक्षिण रायगड युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे यांनी याबाबत कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारला आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या प्रसोल कंपनीमध्ये घडलेल्या घटनेबाबत कंपनी व्यवस्थापनाचे जाधव यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी दक्षिण रायगड युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे यांच्यासहित महाड युवा सेनेचे तालुका अधिकारी प्रफुल्ल धोंडगे, पोलादपूर युवासेना तालुका अधिकारी निलेश शिंदे, . पोलादपूर शहर प्रमुख निलेश सुतार, युवा सेना शहर अधिकारी अमरजीत नगरकर, नथू बुवा दिवेकर, युवा सेनेचे पदाधिकारी बॉबी पॉल, वरंध विभाग प्रमुख साळुंखे व शहर प्रमुख रोहन वाडीले, विभाग प्रमुख संतोष चिकणे, हेमंत पोटफोडे, प्रीतम उमासरे आदी शिष्टमंडळाने कंपनीतील कामगारांच्या संरक्षणासंदर्भात व्यवस्थापना बरोबर चर्चा करून यातून भविष्यात असे प्रसंग घडणार नाहीत असे कंपनी व्यवस्थापनाला चर्चे दरम्यान सांगण्यात आले.

महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल कंपनीत ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या वायू गळतीमुळे एका कामगाराचा मृत्यू व चार कामगार गंभीररित्या जखमी झाल्यानंतर देखील कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व कंपनी निरीक्षक कोणतेही पावले उचलताना दिसत नसल्याने कंपनीमध्ये काम करणाऱ्या उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या चारही बाजूला असणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांमध्ये देखील वायू गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांवर तातडीने ठोस कारवाई करण्यात आली नाही तर युवा सेना उग्र आंदोलन करील असा इशारा दक्षिण रायगड युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!