• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

केएमजी विभागात राष्ट्रवादीच्या तीनही सदस्यांना निवडून आणण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

ByEditor

Oct 7, 2023

खासदार तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने नागोठण्यात विकासगंगा आणणार – शिवरामभाऊ शिंदे
आपल्या विचाराचा सरपंच निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार -विलास चौलकर

शामकांत नेरपगार
नागोठणे :
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी जाहीर झाली असून केएमजी विभागाचा रखडलेला विकास अधिक गतीने करण्यासाठी निःस्वार्थी, प्रामाणिक उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवरामभाऊ शिंदे व नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली केएमजी विभागातील ग्रामस्थांची हॉटेल इंद्रप्रस्थच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी बैठक घेण्यात आली. त्यावेळी केएमजी विभागात राष्ट्रवादीच्या तीनही सदस्यांना निवडून आणण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला.

दरम्यान, नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच निवडून आला तर रायगडचे कर्तव्यदक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने नामदार अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने नागोठण्यात विकासगंगा आणणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे नेते शिवरामभाऊ शिंदे यांनी ग्रामस्थांना दिली तसेच केएमजी विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार व सरपंचपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचा विश्वास व्यक्त करून यावेळी निवडणूक लढाविणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी सरपंच विलास चौलकर यांनी जाहीर केले.

नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी घेण्यात आलेल्या केएमजी विभागातील ग्रामस्थांच्या बैठकीत शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, नागोठणे माजी उपसरपंच सुनिल लाड, राष्ट्रवादी नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, केएमजी विभाग अध्यक्ष प्रफुल नागोठणेकर, माजी अध्यक्ष दिनेश घाग, रोहिदास हातनोलकर, कार्याध्यक्ष संतोष चितळकर, गवळआळी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष रविंद्र वाजे, मराठाआळी ग्रामस्थ मंडळ सेक्रेटरी राजेंद्र गायकर, नाभिक समाज विभागीय अध्यक्ष सुधाकर निंबाळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा – विलास चौलकर

के. एम. जी. विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विलास चौलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मागील नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत आपण गाफिल राहिलो. मी सरपंच पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो त्यावेळी मला 1300 मते मिळाली जर आपण त्यावेळी योग्य नियोजन केले असते तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब टके 1000 मतांनी निवडून आले असते. आपण जनतेसाठी नेहमी झटत असतो. त्यामुळे आपल्यावर जनतेचे प्रेम आहे व आपल्या उमेदवाराला विजयी करण्याची आपल्यात ताकद आहे. हाच विश्वास निर्माण करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असल्याची माहिती देऊन विलास चौलकर पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षात अनेक विकासाची कामे रखडलेली आहेत. विकासकामांमध्ये राजकारण झालेले आहे. विकासकामांचा खोळंबा झालेला आहे. आपल्या गावातील विकासकामांना गती देण्यासाठी आपला हक्काचा माणूस ग्रामपंचायत सभागृहात गेला पाहिजे. के. एम. जी. विभाग हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला नव्हता आता हा विभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास व्यक्त करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा अशा सूचना विलास चौलकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!