• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेल्वे प्रशासन व ठेकेदारा विरुद्ध शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था करणार आमरण उपोषण

ByEditor

Oct 7, 2023

विठ्ठल ममताबादे
उरण :
शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था ही धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय व हक्क न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झाली असून धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा या अनुषंगाने या संस्थेतर्फे विविध प्रयत्न सुरु आहेत. धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वे स्थानकात व रेल्वे संबंधित विविध विकास कामात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जात नसल्याने या संस्थेची मिटिंग दि 6/10/2023 रोजी रात्री 8 वाजता धुतुम येथे संपन झाली. प्रकल्पग्रस्तांवर वारंवार अन्याय होत असल्याने शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संख्येच्या वतीने सोमवार दि 9 ऑक्टोंबर 2023 रोजी रांजणपाडा रेल्वेस्थानकाजवळ आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद अशोक ठाकूर यांनी दिली आहे.

उरण तालुक्यातील धूतूम महसूल हद्दीत रांजणपाडा हे रेल्वेस्थानक नव्याने तयार झाले आहे.धुतुम ग्रामपंचायत हद्दीत व आजूबाजूच्या परिसरात अनेक विकासकामे सुरु आहेत.धुतुम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रांजणपाडा रेल्वेस्थानक व रेल्वे संबंधित विविध विकासकामे सुरु आहेत. मात्र या रेल्वे स्थानकात व रेल्वे संबंधित विविध विकास कामांमध्ये धूतूम गांवातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत, रोजगारात डावलले जात आहे.धतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना रेल्वे स्थानकात व रेल्वेशी संबंधित विविध विकासकामांमध्ये प्राधान्य दिले जात नसल्याने धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.धुतुम महसूली हद्दीत असणा-या रेत्वे स्थानकात व रेल्वेशी संबंधित विविध विकासकामात प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावे रोजगार उपलब्ध व्हावा, प्राधान्य मिळावे या अनुषंगाने शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी सिडको कार्यालय, तहसिल कार्यालय उरण, सहाय्यक पोलिस आयुक्त न्हावा शेवा पोर्ट विभाग,उरण पोलिस ठाणे , आमदार प्रशांत ठाकूर,कामगार नेते महेंद्र घरत, 27 गाव संघर्ष समितीचे सचिव प्रेम पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, ठेकेदार निलेश भोईर, ग्रामपंचायत धुतुम आदी ठिकाणी पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र वारंवार पत्रव्यवहार तसेच शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील धूतूम गावांतील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत, रोजगारात डावलले जात असल्याने धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आमच्या शेमटीखार हद्दीतील रांजणपाडा रेल्वेस्टेशन येथे गावातील काही लोकांनी भरती केली आहे. ती भरती करीत असताना शेमटीखार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाहीत. ठेकेदाराने ही जी काही भरती केली ती कुणाच्या सांगण्यावरुन केली ? त्याचा खुलासा व्हावा. कारण आज पर्यन्त या गावाच्या हद्दीत आलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशिवाय कुठलाच कामगार भरलेला नाही तशी गावातील लोकांची भूमिका आहे. कामगारांची भरती करत असताना तिथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशिवाय तिथे कुणाचाच अधिकार व हस्तक्षेप चालत नाही.वारंवार पत्र देऊन देखील शेतकऱ्यांना न्याय मिळत मिळत नाही म्हणून आम्ही सर्व शेतकरी सोमवार दिनांक “9 ऑक्टोबर 2023” रोजी रांजणपाडा रेल्वेस्थानकाजवळ “आमरण उपोषण करणार आहोत. आमरण उपोषण दरम्यान कोणाचे बरेवाईट झाल्यास अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन, सिडको प्रशासन जबाबदार राहिल यांची प्रशासनाने नोंद घ्यावी.

-विनोद ठाकूर,
अध्यक्ष, शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था उरण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!