सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना विविध पक्ष सक्रीय झाले आहेत. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक पातळीवर पेच-डावपेच रचत मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पळसगाव बुद्रुक आदिवासीवाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोड्चिट्टी देत आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह माणगाव येथे आ. भरत गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे माणगाव तालुक्यात राजकीय गटात एकाच खळबळ उडाली असून येत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्वराज्यसंस्था निवडणुकीतील समीकरणे बदलणार आहेत. याकडे माणगाव तालुक्यासह अखंड रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
निजामपूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात पळसगाव बुद्रुक येथील कार्यकर्ते शरद पवार, शिवदास काशीद, उदय सुर्वे यांच्या सह त्यांचे आदिवासीवाडीतील सहकारी कार्यकर्ते गजानन वाघमारे, धनाजी जाधव, महादू हिलम, सुरेश वाघमारे, विष्णू जाधव, तुकाराम कोळी, मारुती हिलम, बाळाराम हिलम, सुरेश रामा हिलम, परशा हिलम, जाणू जाधव यांच्यासह महिला पुरुषांनी मोठ्या प्रमणात पक्ष प्रवेश केला त्यावेळी उपतालुका प्रमुख नितीन पवार, जेष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे, विभाग प्रमुख मनोज सावंत, माजी विभाग प्रमुख गणेश समेळ, युवासेना अधिकारी केदार पाटील, जेष्ठ शिवसैनिक रामदास दाखीणकर, पळसगाव बुद्रुक सरपंच प्रज्ञा सुर्वे, जेष्ठ शिवसैनिक संदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र हिलम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
