• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कळंबुसरे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारा विरोधात ग्रामपंचायत सदस्य करणार धरणे आंदोलन

ByEditor

Oct 7, 2023

विठ्ठल ममताबादे
उरण :
तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी व लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी नाईक, स्वप्नाली पाटील यांनी कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण,मुख्य कार्य कारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बेलापूर आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली होती. मात्र शांततेच्या व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा कळंबुसरे ग्रामपंचायती मधील श्रष्टाचाराला चाप बसत नसल्याने तसेच संबधित भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याने कळंबुसरे ग्रामपंचायतचे सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी तळीराम नाईक, स्वप्नाली महेश पाटील हे गुरुवार दि. १२ ऑक्टोबर २०२३ पासून कोकण आयुक्त कार्यालय, कोकण भवन बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

जानेवारी २०२३ ते जून २०२३ पर्यंत कळंबूसरे ग्रामपंचायतीमधील ग्रामनिधीत २५ ते ३० लाखांचा भ्रष्टाचार झाल्याच संशय आहे. आम्ही ग्रामपंचायत सदसस्यांनी विचारणा केली असता दुर्लक्ष केला जातो किंवा मासिक सभेला कुठल्याही विषयांवर गोंधळ करून सदस्यांचे लक्ष विचलित करून ठराव पास केले जातात व जमा खर्चाला मान्यता दिली जाते. तसेच काही कामांची खोटी माहिती पुरवली जाते. याबाबत दि १७/०८/२०२३ रोजी संबंधित वरिष्ठ विभागाकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. परंतु, संबंधित प्रकरणी कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, म्हणून न्याय हक्कांसाठी दि. १२/१०/२०२३ रोजी. मा. कोकण आयुक्त, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेली आहे. यांची नोंद संबंधित विभागाने घ्यावी. आम्ही शांततेच्या व कायदेशीर मार्गाने लढा देत आहोत. आम्हाला न्याय मिळावा एवढीच आम्ही रास्त मागणी आहे.

-नितीन केणी,
ग्रामपंचायत सदस्य, कळंबूसरे

कळंबूसरे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार प्रकरणी मंगळवारी 10 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण निकाल देण्यात येणार आहे. चौकशी, तपास पूर्ण झाला आहे. संबंधित व्यक्तींना मंगळवारी कार्यालयात बोलविण्यात येईल.

-समीर वठारकार,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती उरण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!