• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन मतदार संघामध्ये कोणीही आले तरी तटकरे साहेबांची घोडदौड रोखू शकत नाही -श्यामकांत भोकरे

ByEditor

Oct 10, 2023

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
श्रीवर्धन शहरामध्ये आर. डी. सी. सी. बँकेच्या नुतन इमारत उद्घाटन प्रसंगी देशाचे व राज्याचे विविध पक्षांची बडी मंडळी सुनील तटकरे साहेब यांची विजयी घोडदौड रोखण्याकरीता श्रीवर्धन तालुक्यामध्ये येत आहेत तसे समजते. तशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्र व वाहिन्याद्वारे पसरविल्या जात आहेत. तरी सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे पर्यायाने राष्ट्रवादीची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. श्रीवर्धन म्हसळा शहरामध्ये कोणी कितीही रॅली काढल्या, कोणी कितीही दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला तरी आमदार होता येत नाही, असे असते तर कोणीही रॅली काढून आमदार झाले असते. सुनील तटकरे, ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांची विकासकामे मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये आहेत. सुनील तटकरे यांनी विकास कामांकरिता मंत्री मंडळामध्ये स्थान मिळविले असले तरी प्रत्येक गावाचा विकास करणे हेच ध्येय व श्वास तटकरे यांचा आहे, त्यामुळे या दोन महिन्यात सुमारे 950 कोटीचा निधी मंजूर करुन आणला आहे. तसे फलकसुद्धा सर्व ठिकाणी लावले आहेत. तरी कोणीही विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन रायगड राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ता श्यामकांत भोकरे यांनी केले.

नुकत्याच जाहीर झालेल्या श्रीवर्धन तालुक्यातील विविध पंचायतीमध्ये राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल असे त्यांनी स्पष्ट सांगितले. राष्ट्रवादी पक्षाची घोडदौड करिण्याकरीता सुनील तटकरे, ना. आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघ अध्यक्ष महमदभाई मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, माजी नगराध्यक्ष बाळ सातनाक, हिदायतभाई कुदरते, युवक अध्यक्ष सिद्धेश कोसबे, मंगेश कोबनाक, सरचिटणीस सुकुमार तोंडलेकर, उपाध्यक्ष सुचिन किर, जावेद ढांगु, उपाध्यक्ष अमित खोत, माजी सभापती लाला जोशी, उदय बापट, मुख्य संघटक नंदू पाटील, मंदार तोडणकर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मेहनत घेतील असा विश्वास भोकरे यांनी व्यक्त केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!