सलीम शेख
माणगाव : तालुक्यात तोतया माणूस उभा करून जमीन खरेदी केल्याची घटना घडली असून १३ जणांविरोधात गुन्हा माणगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी सुषमा बाजीराव कदम आणि आरोपी बळीराम रामचंद्र कदम (वय ७६ धंदा- एकाच गावात शेती रा. मुंबई २) गजानन रामचंद्र कदम (वय ६३ धंदा-शेती, रा. वावे दिवाळी ता. माणगाव) ३) दिलीप हनुमंत कदम (वय ६६ धंदा – शेती रा. चिंचवळीवाडी पो. गोरेगाव) ४) प्रवीण हनुमंत कदम (वय ६३ मयत असून धंदा-शेती रा. वावे दिवाळी) ५) संदेश हणुमंत कदम (वय ५१ धंदा-शेती रा. बावे दिवाळी) ६) अपर्णा नमुद असलेले प्रफुल खुटवळ (वय ५४ धंदा शेती रा. गोरेगाव) ७) अनिता अनंत कापरे (वय ६९ धंदा-शेती, रा. दमखाडी ता. रोहा) ८) सुहासिनी भरत चव्हाण (वय ५४ धंदा-शेती रा. राणेची वाडी ता. तळा) ९) हणुमंत कदम १०) विश्वास उल्हास कदम (वय ४० धंदा-शेती रा. वावे दिवाळी) हे मौजे वावे दिवाळी ता माणगाव) येथील एकाच गावातील रहिवासी आहेत. फिर्यादी आणि आरोपी क्र १ ते ८ यांची मौजे वावे दिवाळी येथील जमिन मिळकती सर्व्हे नं. १६, ३५० /१,५८ या सामाईक जमिन मिळकती आहेत. फिर्यादीचे पती हे मयत असून सदर मिळकतीवर ७/१२ पत्रकी महसुल दप्तरी दाखल आहेत.
सदर मिळकतीवर नमुद असलेले अरुण हनुमंत कदम ही व्यक्ती गेली २५ वर्षे बेपत्ता आहे. तरी ही दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपी बळीराम रामचंद्र कदम वय ७६ धंदा- एकाच गावात शेती रा. मुंबई २) गजानन रामचंद्र कदम वय ६३ धंदा- शेती, रा.वावे दिवाळी ता.माणगाव ३). दिलीप हनुमंत कदम वय ६६ धंदा. शेती रा. चिंचवळीवाडी पो. गोरेगाव ४). प्रवीण हनुमंत कदम वय ६३ मयत असून धंदा-शेती रा. वावे दिवाळी ५). संदेश हणुमंत कदम स वय ५१ धंदा- शेती रा.बावे दिवाळी ६). अपर्णा नमुद असलेले प्रफुल खुटवळ वय. ५४ धंदा शेती रा. गोरेगाव – ७). अनिता अनंत कापरे वय ६९ धंदा शेती – रा. दमखाडी ता. रोहा ८) सुहासिनी भरत चव्हाण व वय ५४ धंदा-शेती रा. राणेची वाडी ता. तळा हणुमंत कदम ९) विश्वास उल्हास कदम वय ४० धंदा शेती रा. वावे दिवाळी १०) विश्वजीत विष्णू जाधव वय ४० धंदा शेती रा. उतेखोल ११) प्रदीप गजानन भोईर, वय. ४८ धंदा-शेती रा. उरण १२) अनिकेत अनंत पाटील वय २७ धंदा- शेती रा. उरण १३) अज्ञात इसम यांनी संगनमत करुन फिर्यादीला काहीही माहिती पडून न देता अरुण हनुमंत कदम याच्या ठिकाणी बोगस आधारकार्ड बनवून आरोपी क्र. १३ तिन्हाईत व्यक्तीस उभे केले आणि अखत्यारपत्र दस्त क्र ७३४/२०२१ मे दुय्यम निबंधक कार्यालय माणगाव येथे आरोपी यांनी स्वत:च्या लाभात नोंदणीकृत करून घेतले म्हणून या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. अस्मिता पाटील करीत आहेत.
