• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शाळेच्या पहिल्या दिवशी केलेल्या अनोख्या स्वागताने चिमुकले विद्यार्थी भारावले!

ByEditor

Jun 15, 2023

किरण लाड
नागोठणे :
परिक्षा झाल्या आणि शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली, विद्यार्थी वर्ग आनंदीत झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या परिने सुट्टीचा आनंद घेतला. शाळेची सुट्टी संपली आणि 15 जुनपासून शाळा सुरु झाल्या. विद्यार्थी वर्गांचा आनंद ओसंडून वाहु लागला होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी एका अनोख्या पद्धतीने कोएसो अमरचंद जेठमल जैन मराठी प्राथमिक शाळा समितीने विद्यार्थी व पालक वर्ग यांचे औक्षण करुन स्वागत केले. त्यानंतर त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने पालक वर्ग व विद्यार्थी भारावून गेले होते.

या वेळी विविध मान्यवरांच्या हस्ते सरकारी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या या सुंदर, गोड कार्यक्रमाचे आयोजन कोएसो अमरचंद जेठमल जैन मराठी प्राथमिक शाळेचे चेअरमन अनिल काळे, शाळा समितीचे सदस्य जयराम पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री शेवाळे, सहाय्यक शिक्षिका अनघा लोखंडे, शिक्षिका विजया लोखंडे, सर्व पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!