किरण लाड
नागोठणे : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य म्हणुन नावाजलेली रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्थेच्या अध्यक्षपदी सिराज पानसरे यांची तर उपाध्यक्ष पदी प्रथमेश काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी प्रियदर्शनी चालक मालक वाहक संस्थेच्या संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये सिराज पानसरे यांची अध्यक्ष पदी तर प्रथमेश काळे यांची उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. तर संचालक पदी लक्ष्मण उर्फे बाळाशेठ टके, झिमा कोकरे, विठोबा दंत, शैलेश रावकर, काशिनाथ जाधव, सुहैल नाडकर, सद्दाम दफेदार तर महिला संचालक पदी सुरेखा येरुणकर व नगमा सैय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र जैन, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शिवराम शिंदे, दक्षता कमिटीचे माजी अध्यक्ष भाई टके यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.
या निवडी वेळी गुलाम पाटणकर, अजय साळुंखे, हाबिब कुॅंवारे, शेख हसन कोरतकर, अय्याज सैय्यद, वसिम बोंडेकर, रेयान पानसरे, इम्तियाज दफेदार, जमिर पोत्रिक, जावेद दापोलकर आदी संस्थेचे सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.