अनंत नारंगीकर
उरण : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चिरनेर-दिघाटी-साई रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. सारडे-दिघाटी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्ता खडबडीत झाला असून ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. यामुळे वाहने आदळत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पनवेल-गोवा महामार्गाला उरण तालुक्यातील रस्त्यांना जोडणाऱ्या चिरनेर-दिघाटी-साई या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या सारडे-दिघाटी या रस्त्याचे काम हाती घेतले नाही. पावसाळ्यात सदर रस्ता खडबडीत झाला असून ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. यामुळे वाहने आदळत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सारडे-दिघाटी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
