• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सात हजारांची लाच भोवली; कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय येथे कारवाई, खासगी इसम अटकेत

ByEditor

Oct 18, 2023

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ या कार्यालयात तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसम मोहन पुंडलिक गायकवाड (वय ३५, रा. बीड, ता. कर्जत, जि. रायगड) यास नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या १० दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १, कर्जत १, रायगड येथील खाजगी इसम मोहन गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडे ७,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत दिनांक १७ /१०/ २०२३ रोजी तक्रार प्राप्त झाल्याने दि. १७/१०/२०२३ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता वर नमूद आरोपी यांनी पंचासमक्ष ७ हजार रुपये लाचेची रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न होवुन दि. १७/१०/२०२३ रोजी सापळा कारवाईदरम्यान आरोपी यांना तक्रारदार यांच्याकडून रुपये ७ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाल लाच लुचपत विभाग रायगडचे उप अधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलिस हवालदार प्रदीप जाधव, नितीन पवार, चालक पोलिस हवालदार रतन गायकवाड, पोलिस नाईक संतोष तम्हाणेकर, महिला पोलिस नाईक उमा बासरे, योगेश नाईक, सचिन माने, निखिल चौलकर यांनी सदर सापळा कारवाई यशस्वी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!