• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जेएसएम महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा संपन्न

ByEditor

Oct 22, 2023

विनायक पाटील
पेण :
मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग ४च्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा दिनांक १८ ओक्टोबर ते २१ ऑक्टोबर रोजी जेएसएम महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. दिनांक १८ ओक्टोबर रोजी महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह चित्रा पाटील व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिनांक २० ऑक्टोबर रोजी पुरूष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये पीएनपी महाविद्यालय, अलिबाग यांनी प्रथम, गुरूकुल महाविद्यालय चिपळूण यांनी द्वितीय तर पतंगराव कदम पेण महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच महिला कबड्डी स्पर्धेमध्ये पीएनपी महाविद्यालय अलिबागच्या संघाने प्रथम, एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण यांनी द्वितीय तर श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय कोलाडच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या शुभहस्ते सर्व विजेत्या संघांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जेएसएम‌ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. सोनाली पाटील, जिमखाना व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. रविंद्र चिखले, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन निवड समितीचे सदस्य प्रफुल्ल पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भुमिका पार पाडली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!