कर्जत पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असतानाच, या सात ग्रामपंचायतीपैकी नसरापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील छोटी चांदई येथे निवडणूकीच्या प्रचार पूर्व संध्येला हाणामारीचा प्रकार घडला असुन, शांततेत पार पडणाऱ्या निवडणूकीला गालबोट लागण्याचा प्रकार घडला आहे. तर या हाणामारीत दोघे गंभीर जखमी तर तिघे किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांना पनवेल येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तिन जखमींवर कर्जत उप जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन, दोघांना अटक करण्यात आले आहे. तर पुढील तपास हा कर्जत पोलीस ठाणे करीत आहे. तर निवडणूकीच्या प्रचार पूर्व संधीला हा हाणामारीचा प्रकार घडला असल्याने, पार पडणाऱ्या निवडणूकीला गाळबोट लागले असुन गावात तणावाचे वातावरण असल्याने पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नसरापूर ग्राम पंचायत हद्दीतील छोटी चांदई येथील वार्ड क्रमांक २ येथे निवडणूकीच्या प्रचारपूर्व संध्येला तक्रारदार प्रकाश गोपाळ कोळंबे वय वर्ष ३८ हे त्यांच्या इतर साथीदारांसह त्यांचे काका बबन कोळंबे यांच्या घरा समोर उभे असताना, तानाजी रामचंद्र कोळंबे हे आपल्या ११ साथीदारांसह बेकायदेशीर जमाव जमवून तक्रारदार प्रकाश गोपाळ कोळंबे यांना शिविगाळ करत त्यांचे काका बबन कोळंबे यांच्या पाठीवर व उजव्या हतावर लोखंडी सळई हल्ला करून त्यांना दुखापत केली. या संदर्भात प्रकाश गोपाळ कोळंबे व त्यांचे साथीदार यांनी जाब विचारला असता, तानाजी रामचंद्र कोळंबे, कोळंबे यांनी तक्रारदार प्रकाश कोळंबे यांच्या डोक्यात व डावे व उजव्या हातांच्या बोटांवर लाकडी फळी व लोखंडी सळई हल्ला करून दुखापत केली आहे. तर प्रकाश कोळंबे यांच्या साथीदारांवर नागेश रामदास कोळंबे, उमाजी तुकाराम धुळे व सुरेश रामदास कोळंबे यांनी लोखंडी सळईने डोक्यात व पाठीवर हल्ला करून दुखापत केली आहे. व संभाजी तुकाराम धुळे यांनी तक्रारदार यांच्या साथीदाराला डोक्यात दगड मारून हल्ला करत दुखापत केली आहे. तर तानाजी रामचंद्र कोळंबे यांच्या इतर साथीदारांनी तक्रारदार यांचे इतर साथीदारांना शिविगाळ व दमदाटी करून हाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर या हाणामारीत १) सुभाष कृष्णा कोळंबे वय वर्ष ४३, २) प्रकाश गोपाळ कोळंबे वय वर्ष ३८, ३) माधव नामदेव कोळंबे वय वर्ष ५२, ४) सुरेश गोपाळ कोळंबे वय वर्ष ३३, ५) बबन पांडू कोळंबे सर्व राहणार छोटी चांदई हे जखमी झाले असुन, यामध्ये सुरेश गोपाळ कोळंबे व सुभाष कृष्णा कोळंबे हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना उपचाराकरीता पनवेल येथील एम जी एम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर तीन किरकोळ जखमींवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.
या घडलेल्या हाणामारीच्या प्रकाराबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८२/२०२३ भा.द.वि.सं. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ३२६, ३३६, ५०४, ५०६ , सह मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लघंन १३५ नुसार १)तानाजी रामचंद्र कोळंबे, २) नागेश रामदास कोळंबे, ३) चिंतामण मंगल म्हात्रे, ४) तानाजी रघुनाथ कोळंबे, ५) उमाजी तुकाराम धुळे, ६) संभाजी तुकाराम धुळे, ७) सरेश रामदास कोळंबे, ८) राम बाळकृष्ण कोळंबे, ९) नंदू विलास कोळंबे, १०) सुदाम बाळकृष्ण कोळंबे, ११) रघुनाथ बुवाजी कोळंबे, १२) सौ. निरा तुकाराम धुळे सर्व राहाणार छोटी चांदई यांच्या विरोधात गृन्हा दाखल झाला असुन, त्यापैकी उमाजी तुकाराम धुळे व सुदाम बाळकृष्ण कोळंबे यांना कर्जत पोलीसांनी अटक केली आहे. तर पुढील तपास हा सह पोलीस निरिक्षक किरवले हे करीत आहे. तर निवडणुकीच्या प्रचार पूर्व संध्येला दोन गटा मध्ये जोरदार हाणामारीची घटना घडली असल्याने निवडणूकीला गाळबोट लागल्याने छोटी चांदई व नसरापूर ग्रामपंचायत भागात तणावाचे वातावरण झाला असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व मतदान प्रकीया सुरळीत पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
