शिवसेना आणि महविकास (इंडिया) आघाडीने खाते उघडले
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेनंतर चार थेट सरपंचासह एक उपसरपंच तसेच इतर सदस्य निवडीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाला. निकाल जाहिर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.

तालुक्यात एकूण आठ ग्रामपंचायतसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. एकूण आठ पैकी तीन ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या म्हणून उर्वरित पाच ग्रामपंचायती प्रत्यक्षात निवडणूक झाली. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीपैकी गाणी सरपंचपदी राष्ट्रवादीचे आदित्य कासरुंग, दांडगूरी सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेहा महाडिक, बागमांडला उपसरपंचपदी शिवसेना (शिंदे गट) प्रतोष कोलथरकर, हरवीत सरपंचपदी राष्ट्रवादीचे इम्तियाज परकार, भरडखोल सरपंचपदी राष्ट्रवादीच्या ज्योती काळपाटील वावे तर्फे श्रीवर्धन सरपंचपदी इंडिया आघाडीचे मनोहर सावंत, खारगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे अमोल पुसाळकर आणि वाकलघर उपसरपंचपदी राष्ट्रवादी बिनविरोध उमेदवार असणार आहे.

तालुक्यात एकूण आठ पैकी सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे तर एक ग्रामपंचायत शिंदें गटाकडे तर उर्वरित एक ग्रामपंचायत ही इंडीया आघाडीला मिळाली आहे.
