• उद्धव ठाकरे यांनी केले किशोरभाई जैन यांचे अभिनंदन
• जनसेवा विकास आघाडीला शबाना मुल्ला यांच्या बिनविरोध निवडीने लागली होती विजयाची चाहूल
शामकांत नेरपगार
नागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (उबाठा) नेते किशोरभाई जैन यांनी गेले 15 वर्ष आपला करिष्मा दाखविला होता, आजही त्यांचा तोच करिष्मा नागोठणेकरांना पाहवयास मिळाला. नागोठण्याच्या विकासाचे शिल्पकार किशोरभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सांभाळल्याने तसेच उपविभाग प्रमुख संजय महाडिक यांचे नागोठण्यातील सर्वसामान्य जनतेशी असलेल्या जिव्हाळाच्या संबंधामुळे सरपंचपदाच्या उमेदवार संजय महाडिक यांच्या धर्मपत्नी सुप्रिया महाडिक यांनी 13३3 मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार मनिषा लक्ष्मण टके यांचा दारुण पराभव केला. निवडणुक मतदानापूर्वी जनसेवा विकास आघाडीच्या प्रभाग क्र. 3 च्या उमेदवार शबाना असिफ मुल्ला या बिनविरोध निवडून आल्याने जनसेवा विकास आघाडीला शबाना मुल्ला यांच्या विजयाने सर्व उमेदवरांच्या विजयाची चाहूल लागली होती. जनसेवा विकास आघाडीचे १७ पैकी १६ सदस्य विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या पूनम महादेव इप्ते यांनी शिवसेनेच्या भक्ती जितेंद्र जाधव यांचा अल्पमताने पराभव केला. त्या राष्ट्रवादीच्या विजयी झालेल्या एकमेव सदस्य आहेत. दरम्यान, निवडूणुकीत इंडीया आघाडी प्रणित जनसेवा विकास आघाडीच्या प्रचंड विजयामुळे शिवसेना नेते किशोरभाई जैन यांचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून विशेष अभिनंदन केले.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या विजयाचा ट्रेलर नागोठणेकरांनी दाखून दिला असून पुढील विधानसभा नुवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात इंडिया आघाडीचा पूर्ण पिक्चर पाहवयास मिळणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला. नागोठण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सोबत घेतले म्हणून मुस्लिम मतदार नाराज झाले व त्यांनी आपली एकगठ्ठा मते सुप्रिया महाडिक यांना देऊन त्यांना विजयी केले असल्याचे बोलले जात असून मुस्लिम मते नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णायक ठरतात हे पुन्हा या निवडणुकीत दिसून आले. हाच धागा किशोरभाई जैन यांनी पकडल्यामुळे त्यांची विजयाच्या पतंगने आकाशात भरारी घेतली असेही जाणकार राजकारण्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, जनसेवा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांची नागोठणे शहरात गुलालाची उधळण करून फटाक्यांच्या आतषबाजीत, जल्लोषात मिरवणूक काढून आपला आनंद साजरा केला.
शिवसेना नेते किशोरभाई जैन यांच्या नागोठणे गावाच्या रोल मॉडेल संकल्पनेवर ग्रामस्थ बेहद खुश होते. किशोरभाई जैन यांची रोल मॉडेल संकल्पना जवळ जवळ यशस्वी झाली असून थोडयापार प्रमाणात ही संकल्पना अपूर्ण होती. नागोठणे १०० टक्के रोल मॉडेल फक्त किशोरभाई जैनच करू शकतील याचा विश्वास नागोठणेकर जनतेमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप व शिवसेना (शिंदे गट) हे तीनही सत्ताधारी पक्ष एकत्र आले तरी ते किशोरभाई जैन यांचा पराभव करू शकले नाहीत.
जनसेवा विकास आघाडीचे विजयी –
सरपंच – सुप्रिया संजय महाडिक
विजयी सदस्य पदाचे उमेदवार
प्रभाग क्र. 1 – मिलिंद बाबुराव धात्रक (शिवसेना ), पूनम महादेव इप्ते (राष्ट्रवादी), अमृता अनिल महाडिक (शिवसेना)
प्रभाग क्र. 2 – आकलाख पानसरे (राष्ट्रवादी-शरद पवार), विनिता सतीश पाटील, शहानाज खुर्शीद अधिकारी
प्रभाग क्र. 3 – जन्नत सोहेब मुल्ला, शबाना असिफ मुल्ला (बिनविरोध)
प्रभाग क्र. 4 – संतोष रमेश नागोठणेकर, लंबाते सुलतान अब्दुल मजिद, ज्योती संदिप राऊत
प्रभाग क्र. 5- सचिन ठोंबरे, प्रकाश कांबळे, भाविका गिजे
प्रभाग क्र. 6 – मंगी महालत कातकरी, ज्ञानेश्वर सुदाम साळुंखे सुप्रिया संजय काकडे
जनतेनचे विकासाला प्राधान्य -डॉ. मिलिंद धात्रक
आमचे नेते किशोरभाई जैन यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली मी पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून गावाचा ‘न भूतो ना भविष्यती’ असा विकास केल्यामुळे नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने विकासाला प्राधान्य देऊन पुन्हा आमच्या हातात विकासाची चावी दिली असून नागोठण्याच्या जनतेच्या विश्वासाला यापुढेही आम्ही तडा जाऊ देणार नाही व किशोरभाई जैन यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली नागोठण्यात आज जसा गुलाल उधळला गेला तसा विकासाचा धूर उसळला जाईल अशी खात्री माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मा. श्री. किशोर शेठ जैन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये हॅट्रीक विजय. मा. किशोर शेठ म्हणजे दमदार नेतृत्व, ग्राउंड लेव्हल चे समाजकारण व उच्च स्तरावरील प्रभावी राजकारण व आय. आय. एम.मधील एम.बी.ए. केलेल्या विद्यार्थ्यांना लाजवेल एवढे उत्कृष्ट व्यवस्थापन ही वैशिष्ट्ये सांगता येतील. भर समुद्वातून तुफान वादळात ही मजबूत त्यांची कॅप्टन म्हणून असलेली बोटीवरील पकड त्यांना विजयी होण्यासाठी पुरेशी ठरली आहे. महाराष्ट्रातील निकाल कसेही असतील पण कोकणातील प्रवेशद्वारावरील आजचा हा निकाल राज्य नेतृत्वांना सलामी देण्यासाठी भाग पाडण्यास पुरेसा आहे. भाई आपणास पदवीधर विधान परिषद खुणावत आहे. तयारी करा व व्हा आमदार… आई जगदंबा व तुळजाभवानी चे आशिर्वाद आपणास आहेतच पण जनता जनार्दन आपल्या सोबत आहे हे पण तेवढेच १००℅ खरे आहे. .
आपणास पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
प्रो. डॉ. श्रीकृष्ण तुपारे
नागोठणे.
8412991873