• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विद्यालयांना संगणक संच भेट

ByEditor

Jun 18, 2023

नंदकुमार मरवडे
खांब :
साई फाऊंडेशन मुंबई व नागटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने विद्यालयांना काॅम्प्युटर संच भेट देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्रमिक विद्यालय चिल्हे व न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी येथील विद्यालयांना साई फाऊंडेशन ट्रस्ट मुंबईचे चेअरमन डॉ. असिफ कासकर यांच्या विशेष प्रयत्नातून सदर काॅम्प्युटर संच भेट देण्यात आले आहेत. गतवर्षी दोन्ही विद्यालयात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात विद्यालयांना काॅम्प्युटर संच भेट देणार असल्याचे वचन डॉ. असिफ कासकर यांनी दिले होते. यावर्षी त्यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपली वचनपूर्ती केली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निर्मला नारायण, विनोद पाटील, संजय दळवी, समुख कामत, निखिल दुधे, सागर धारणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे आपल्या शासनाचे धोरण असून त्या धोरणाला अनुसरून आम्ही आमचा छोटासा प्रयत्न केला असून यासाठी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच भविष्यात विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ई-एज्युकेशन हा उपक्रम शाळांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ असिफ कासकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!