ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीतील अपघातात अकरा कामगारांचा मृत्यू
मिलिंद माने
महाड : ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेतील उर्वरित चार कामगारांचे मृतदेह देखील सापडले आहेत. यामुळे ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीतील अपघातातील मृतांची संख्या अकरा झाली आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनी मधील शोध मोहीम थांबवल्याचे प्रशासनाने जाहीर केले.
महाड औद्योगिक वसाहती मधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये दोन दिवसापूर्वी भीषण आग लागून अकरा कामगारांचा अडकून मृत्यू झाला होता या कंपनीतील. दिवसभर आग विझवण्याचे काम सुरू असल्याने आग लागलेल्या प्लांटमध्ये नक्की किती कामगार आहेत याची कल्पना कंपनी प्रशासनाला आली नाही. मात्र सकाळी कंपनीमध्ये दाखल झालेले कामगार आणि बाहेर पडलेले कामगार याचा ताळमेळ तपासल्यानंतर कंपनीत अकरा कामगार अडकले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात आली.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनी प्रशासनाने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले मात्र यामध्ये खूप वेळ गेला होता. दिवस-रात्र एनडीआरएफ आणि आपदा मित्र संस्था यांनी धुमसणारी आग रासायनिक द्रव्यांची भीती असताना देखील प्लांटमध्ये अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू केला. प्लांटचा आतील स्लॅब कोसळल्यामुळे आणि आतमध्ये असलेल्या केमिकलचे ड्रम यामुळे जवान काळजीपूर्वक काम करत होते. यातच दुसऱ्या दिवशी फक्त सात कामगारांचे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. उर्वरित चार कामगारांचे मृतदेह शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरूच ठेवली. अखेर आज सायंकाळ पर्यंत चार कामगारांचे मृतदेह देखील आढळून आले. यामुळे या अपघातातील मृतांची संख्या अकरा झाली आहे
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील कामगारांचे. प्राप्त मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने हे सर्व मृतदेह डी एन ए चाचणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहेत.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमधील मृत पावलेल्या कामगारांबद्दल कंपनीने जाहीरपणे कोणताही शोक व्यक्त न केल्याने कंपनी विरोधात महाड औद्योगिक क्षेत्रातील सर्व च कंपन्यातील कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे
