किरण लाड
नागोठणे : शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे साहित्य व त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये अडीअडचणीला मदत करणारी शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची संस्था म्हणजे रोहा तालुक्यातील रोहा कृषी उत्पन्न बाजार समिती. या समितीच्या उपाध्यक्ष पदी कोंडगाव,नागोठणे येथील जयंत अनंत वाघ यांची बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जयंत वाघ यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. जयंत वाघ हे नागोठणे विभागात उत्तम शेतकरी म्हणुन नावाजलेले आहेत तसेच ते कृषी खात्याचे पदवीधर आहेत. त्यांचे नागोठणे शहरात शेतीला लागणारे बी-बियाणे, औषधे यांचे दुकान असून त्यांच्या निवडीचे स्वागत कोंडगाव ग्रा. पं. सरपंच, शेकाप नेते अनंत वाघ व वरवठणे गावाचे शेकाप नेते गणपतशेठ म्हात्रे तसेच विभागातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. वाघ यांच्या निवडीने नवीन पिढीतील युवकांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत नागोठणे व कोंडगावमध्ये मिठाई वाटुन तसेच फटाके फोडून केले.