गणेश प्रभाळे
दिघी : बोर्लीपंचतन येथील कुंभार समाजाच्या वतीने कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने गुरुवारी दिंडी काढण्यात आली. दिंडीचे प्रस्थान विठ्ठल रुक्माई मंदिरातून झाले.
टाळ मृदुंगाच्या गजरात ग्यानबा तुकाराम आणि विठू नामाचा गजर करत गावात फिरणारी दिंडी गेली कित्येक वर्ष परंपरा कायम ठेवत, दरवर्षी या दिंडीचे आयोजन कुंभार समाज करत आहे. यामध्ये वारकरी तसेच डोक्यावर तुळस घेऊन महिलावर्ग आणि लहान मुले पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदुंग विठ्ठलाच्या गजरात ही दिंडी फिरताना गावात भक्तिमय वातारणात पाहायला मिळते. या दिंडीमध्ये महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने विठुनामाने परिसर दुमदुमून गेला आहे.
